
प्रतिनिधी – विनोद चव्हाण-ओम साईराज भजन मंडळाचा १५ वा वर्धापनदिन आणि भजन स्पर्धा भक्तिमय वातावरणात नालासोपारा मध्ये आयोजन या विशेष सोहळ्यात श्री सत्यनारायण महापूजा, कौटुंबिक स्नेहसंमेलन, तसेच भव्य दिव्य रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि देवप्रतिमा पूजनाने झाली. यावेळी श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था (महासंघ) चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जयराम पवार माऊली, सचिव श्री विनोद चव्हाण माऊली, सहसचिव प्रभाकर नांगरेकर, जिवन मोरे, अरविंद मोरे तसेच विविध भजन मंडळांचे प्रमुख आणि सदस्य उपस्थित होते. या भव्य भजन स्पर्धेत एकूण ३२ भजन मंडळांनी सहभाग घेतला. सर्व स्पर्धकांनी उत्कृष्ट सादरीकरण करत श्रोत्यांची मने जिंकली. पंचपदी भजनांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.
ओम साईराज भजन मंडळ महिला विभागाच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संलग्न भजन मंडळांच्या महिला कार्यकर्त्यांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया अंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून चार्टर्ड अकाउंटंट पदवी प्राप्त केली त्या बदल कु. सायली हनुमान कदम यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता अंतिम भजन सत्रात विविध मंडळांच्या गायकांनी भक्तिगीतांच्या माध्यमातून वातावरण भक्तिरसाने भरून टाकले. यानंतर पारितोषिक वितरण सोहळ्यास व्यासपिठावर श्री संत सेवा भजन सामजिक संस्था चे संस्थापक-अध्यक्ष शिवाजी पाटील माऊली, श्री समर्थ कृपा भजन मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोरे, ओम गुरूदेव भजन मंडळाचे कार्याध्यक्ष सुनिल कदम, दिपक धनावडे, सुनिल जोगले,सुरेश भेकरे, राजू दवंडे, दिपेश शेडगे, सर्वेशजी तांडेल,शरद जाधव,शिवाजी भानत, गणेश पवार,वसंत प्रभू,नितेश धुळ, लोमेश टाकलेकर होते संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्र संचालनाची धुरा श्री राकेश डाफले आणि श्री नितीन जाधव यांनी सांभाळली.
स्पर्धेतील विजेते मंडळे सांघिक प्रथम क्रमांक – श्री पांडुरंग कृपा भजन मंडळ (गायक श्री राम उतेकर), सांघिक द्वितीय क्रमांक – श्री दत्त साई रे. प्र. भजन मंडळ (गायक श्री प्रमोद कुळये) सांघिक द्वितीय क्रमांक – श्री साई प्रासादिक भजन मंडळ (गायक श्री एकनाथ झिमण) उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक – श्री साई सेवा भजन मंडळ (गायक जिवेश सालवादी) उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक – श्री वारकरी भजन मंडळ, टिटवाला (गायक शंकर पाटील),उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक – श्री स्वामी समर्थ रे. प्र. भजन मंडळ, कल्याण (गायक सूरज कातकर) उत्तेजनार्थ चतुर्थ क्रमांक – श्री समर्थ कृपा भजन मंडळ (गायक अरविंद मोरे) उत्तेजनार्थ पंचम क्रमांक – श्री ब्रह्मानंद भजन मंडळ (गायक राहुल जाधव) उत्कृष्ट गायक – साईनाथ भजन मंडळ (गायक अनिकेत वालापकर) उत्कृष्ट डफली वादक – श्री साई गणेश भजन मंडळ (वादक नितेश धुळप) उत्कृष्ट रिदम वादक – श्री छत्रपती शिवराय भजन मंडळ, वाशी (वादक रोहित साबळे)उत्कृष्ट चकवा वादक – हेरंब भजन मंडळ, उत्कृष्ट कोरस – ओम गुरूदेव भजन मंडळ, उत्कृष्ट शिस्तबद्ध – श्री माऊली प्रासादिक भजन मंडळ, कल्याण लक्षवेधी कलाकार – श्री साच्छिदानंद भजन मंडळ (चकवा वादक कु. प्राजक्ता परब)स्पर्धा परीक्षक सन्मा श्री सुबोध सावंत आणि श्री राहुलजी सामंत यांनी घोषित केले. यावेळी ओम साईराज मंडळाचे संस्थापक – श्री. रुपेश हातणकरकार्याध्यक्ष – श्री. नितिन जाधव, श्री. जयदास आरेकर, अध्यक्ष – श्री. कमलाकर शेडेकर, श्री दिलीप हुंदळेकर, सचिव – श्री. कल्पेश वारीक, श्री. प्रितम सपकाळ
खजिनदार – श्री. अमोल खेडेकर, श्री. प्रदिप वासकर, सल्लागार – श्री. शैलेश बामणे, श्री.नारायण सांगले,
सदस्य – श्री. समीर पास्टे, श्री. रुपेश मांडवकर, श्री. सुनिल खिडबिडे, श्री. निलेश तांबे, श्री संजय वाढवल, श्री. प्रतिक कदम, श्री. संकेत अपंडेकर, श्री. मितेश चव्हाण, श्री. आशिष माने, श्री. दत्ताराम हुंबरकर, श्री. योगेश धाडवे, श्री. रोशन जावकर, श्री. ओमकार कातकर यांच्या अथक परिश्रमानी कार्यक्रम संपन्न झाला. साईराज भजन मंडळ आहे, ते आपल्या सर्वांच्या प्रेम, आशीर्वाद, मार्गदर्शन आणि सहकार्यामुळेच! भविष्यातही अशीच भक्तीमय सेवा सुरू ठेवू,” असे आयोजकांनी सांगितले.