पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; ९ जणांचा करुण अंत; लहान बाळाचाही समावेश….

Spread the love

पुणे- पुणे-नाशिक महामार्गावर पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेने महाराष्ट्र हादरुन गेला आहे. आज शुक्रवारी पुणे नाशिक महामार्गावर एसटी बस, ट्रक आणि मॅक्झिमो व्हॅनमध्ये मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झालेत. यात एका ५ वर्षीय बाळाचादेखील समावेश आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला असून यामध्ये 9 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही भयंकर घटना घडली. सुरुवातीला प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की  चेंडूप्रमाणे ही मॅक्स ऑटो फेकली गेली आणि पुढे एक ब्रेक फेल झालेल्या बसवर आदळली. या भयंकर अपघातात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा दुर्दैवी अंत झाला.

या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नारायणगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती वर्तवली जात आहे. दरम्यान, या अपघातप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना शासकीय मदत जाहीर केली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे  पुणे पोलिस अधीक्षकांना सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page