काळंबेवाडी नागरी सुविधांसाठी जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या समवेत बैठक
संगमेश्वर – तालुक्यातील गडनदी मध्यम धरण प्रकल्प बाधीत राजीवली काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणातील प्रकल्पग्रस्तांच्या नागरी सुविधा कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार शेखर निकम सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीला खरी लोकजागृती मुख्य संपादक श्री. संतोष येडगे, रत्नागिरी जिल्हा नियोजन माजी सदस्य श्री. तुकाराम येडगे,जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.प्रकाश जाधव, उप विभागीय अभियंता श्री.आर.एस. रणदिवे, शाखा अभियंता श्री.अभीजीत कदम , प्रकल्पग्रस्त श्री. संतोष काळंबे, श्री. अनंत काळंबे आणि इतर सर्व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
राजीवली काळंबेवाडी पुनर्वसन संदर्भात आमदार शेखर निकम यांनी सर्व कामांचा आढावा घेवून प्रलंबीत कामांसाठी मंगळवारी दि.२१ जानेवारी २०२५ रोजी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन केले आहे.
आमदार शेखर निकम यांनी काळंबेवाडी पुनर्वसन संदर्भात आढावा घेवून नागरी सुविधा संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्याने आणि मंत्रालयात बैठकीचे आयोजन केल्याने श्री. संतोष येडगे यांनी आमदार शेखर निकम यांचे या बैठकीत आभार मानले .