देवरुख- जिल्हास्तरीय धावणे स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील हरपूडे येथील श्रीयश मानसिंग आंब्रे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल श्रीयशवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे गावचा सुपुत्र कु. श्रीयश आंब्रे याने सावर्डे येथे झालेल्या जिल्हास्तरीय धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातील सर्व स्पर्धकांना मागे टाकत त्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. जिल्हास्तरीय धावण्याच्या स्पर्धेत श्रीयशने आपला दबदबा कायम ठेवला आहे. पुन्हा एकदा हरपुडे गावाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. त्याने संगमेश्वर तालुक्याचा विजयाचा झेंडा फडकवला आहे. याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.