चिपळूण/ प्रतिनिधी- वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन श्री प्रशांत यादव यांच्या वाढदिवसानिमित्त आज चिपळूण येथे आयोजित शेतकरी कृषी मेळाव्याचे उद्घाटन श्री शरद पवार आणि माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत थाटात पार पडले. या मेळाव्यात दहा प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात संगमेश्वर तालुका ऍग्रो स्टार फार्म फ्रेश शेतकरी उत्पादक कंपनीचे चेअरमन श्री विलास शांताराम शेलार यांनाही प्रगतशील शेतकरी म्हणून सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी प्रगतशील शेतकऱ्यांच्या योगदानाची प्रशंसा करताना शेतीच्या प्रगतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतींचा उपयोग कसा महत्त्वाचा आहे, यावर भर दिला. या वेळी प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपले अनुभव आणि यशोगाथा उपस्थितांसमोर मांडल्या. हा कार्यक्रम शेतकरी समुदायासाठी प्रेरणादायी ठरला असून, वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आणि प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशाची गाथा यामुळे उपस्थितांमध्ये नवी ऊर्जा संचारली.