पालघरच्या बोईसर-तारापूर MIDC अग्नितांडव! युके अरोमॅटिकसह इतर दोन कंपनीत भीषण आग, परिसरात धुराचे लांबच लांब लोळ..  

Spread the love

आशिया खंडातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्रापैकी एक असलेल्या बोईसर तारापूर एमआयडीसीत (Boisar Tarapur MIDC) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

पालघरच्या बोईसर-तारापूर MIDC अग्नितांडव! युके अरोमॅटिकसह इतर दोन कंपनीत भीषण आग, परिसरात धुराचे लांबच लांब लोळ…

पालघर : आशिया खंडातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्रापैकी एक असलेल्या बोईसर तारापूर एमआयडीसीत (Boisar Tarapur MIDC) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. बोईसरच्या सालवड शिवाजी नगर परिसरातील कारखान्याला भीषण आग लागली असल्याची माहिती पुढे आली आहे. बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर के-6 मधील युके ॲरोमॅटिक अँड केमिकल्स या कारखान्याला भीषण आग लागली आहे. घटनेची माहितीमिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे सर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आज या कारखान्यातील कामगारांना सुट्टी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र ही आग कशामुळे लागली हे कारण अजूनह अस्पष्ट आहे. हा केमिकलचा कारखाना असल्यामुळे आग झपाट्याने पसरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही आग इतकी भीषण आहे की आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोळ लांबूनही दिसताय.

युके ॲरोमॅटिकसह बाजूच्या दोन कंपन्या ही आगेच्या भक्षक स्थानी


बोईसर तारापूर एमआयडीसीतील यु के ॲरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला लागलेल्या आगीचा भडका वाढला असून कंपनी शेजारी असलेल्या श्री केमिकलला देखील आग लागली आहे. यात श्री केमिकल कंपनी देखील आगीच्या भक्षस्थानी आहे. दरम्यान, अग्निशमनदलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. सुदैवाने आगीनंतर कामगारांनी पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये कामगार अडकले नसल्याची प्रशासनाची प्राथमिक माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू. स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. शिवाजीनगर बाजूचा रस्ता दुरुस्तीसाठी खोदल्याने टँकर आणि इतर वाहनांनाही आग विझवणाऱ्या वाहनांसाठी अडथळा निर्माण केला आहे. यात परफ्युम आणि प्रेग्नेंसेस बनवणारा कारखाना होता. या कारखान्यामध्ये मोठा केमिकल साठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page