*रत्नागिरी-* रत्नागिरी तालुक्यातील निवळी गावडेवाडी येथील जाकादेवी मंदिर लगत श्री. किरण रघुनाथ साळवी यांच्या किरण फार्म हाऊसमधील आंबा कलम बागेत पंप हाऊस शेजारी असलेल्या उघड्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. वनविभागाने या बिबट्याला पिंजऱ्याच्या साहाय्याने बाहेर काढत जीवदान दिले आहे.
याबाबत वनविभाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिबटया जातीचा वन्य प्राणी पडलेला असलेबाबत निवळी गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री संजय निवळकर,गावच्या पोलीस पाटील श्रीम. पवार यांनी वनविभागाला कळवले त्या प्रमाणेविना विलंब वनविभाग रेस्क्यू टीमचे साहित्य घेऊन शासकीय वाहनांमध्ये पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले विहिरीची पाहणी करता सदर विहिरीला कठडा असून सदरची विहीर पक्की गोल असून विहिरीची लांबी अंदाजे 75 ते 80 फूट खोल आहे गोलाई 18 फूट असून 10फूट पाणी असलेल्या विहिरीमध्ये वन्यप्राणी बिबट्या विहिरीत पाण्याच्या वर सुरक्षित बसलेला दिसून आला शासकीय वाहनातून पिंजरा उतरवून पिंजऱ्याला दोऱ्या बांधून पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्याचे बंद करण्यास वनविभागाला यश आले सदरचा पिंजरा विहिरीबाहेर काढून पशुवैद्यकीय अधिकारी यांचे कडून वैद्यकीय तपासणी केली सदरचा बिबट्या हा नर जातीचा असून तो सुमारे चार वर्षे वयाचा असून सुस्थितीत आहे.
सदर रेस्क्यूची कार्यवाही ही माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण )श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर कामगिरीसाठी श्री प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी,श्री न्हानू गावडे वनपाल पाली,श्री प्रभू साबणे वनरक्षक रत्नागिरी, श्रीमती शर्वरी कदम वनरक्षक जाकादेवी,तसेच पोलीस अधिकारी श्री लक्ष्मण कोकरे पोलीस हवालदार, श्री रुपेश भिसे पोलीस कॉन्स्टेबल, गावच्या पोलीस पाटील सौ पवार मॅडम, पोलीस पाटील श्री शितप, संजय निवळकर अनिकेत मोरे, महेश धोत्रे, स्वस्तिक गावडे ,शाहिद तांबोळी तसेच गावातील सगळे ग्रामस्थ उपस्थित होते संजय निवळकर व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदरचा बिबट्या हा सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा कोणताही वन्यजीव संकटात सापडल्यास वनविभाग चा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन गिरिजा देसाई विभागीय वनाधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे.