बीड- शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. मस्साजोग हत्या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. तर संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. देशमुख कुटुंब एकटे नाही, आम्ही सर्व त्यांच्या पाठिशी आहोत.
दरम्यान शरद पवार म्हणाले की, बीड जिल्ह्यात दहशतीचे वातावरण आहे. त्यातून सर्वजणासंनी सोबत येत यातून बाहेर पडले पाहिजे, असे म्हणत अप्रत्यक्ष मुंडेंवर निशाणा साधला आहे. तर संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला आहे. तर बजरंग सोनवणेंनी हत्येचा मुद्दा उचलून धरला आहे. या हत्येमागे सूत्रधार कोण हे मुळात जाऊन शोधणं गरजेचे आहे. केंद्र-राज्य सरकारने या प्रकरणाची नोंद घेतली पाहिजे. संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलायला आम्ही तयार आहोत.
सूत्रधार शोधला पाहिजे…
शरद पवार म्हणाले की, या प्रकरणात खरा सूत्रधार कोण हे पाहून त्याला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर यांनी जातमध्ये न आणता हा मुद्दा विधानसभेत मांडला. या प्रकरणी सरकारने कितीही रक्कम दिली तर गेलेला माणूस परत येत नाही. त्यांचे दु:ख कमी होऊ शकत नाही.
पीएसआयने आरोपी सोबत चहापानी घेतला…
बीडचे बजरंग खासदार सोनवणे म्हणाले की, पाटील नावाचे जे पीएसआय आहेत त्यांनी बराच वेळ आरोपीसोबत चहापानी घेतल्याचे व्हिडिओ आहेत. आता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुळापर्यंत जाणार, पण मुळापर्यंत जाणार कधी हा प्रश्न आहे.
13 दिवसानंतरही आरोपी अटकेत नाही…
बीडचे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 13 दिवस झाले पण आज मुख्य आरोपीला अटक होत नाही. त्यांच्या मुलीची काय भावना आहे, की 7 आरोपींना पकडाल पण त्यांचा जो म्होरक्या आहे, त्यांना कधी पकडाल नाही तर तो अजून 7 आरोपी तयार करेल अशी भीती त्यांच्या लहान मुलीला पाटत आहे. या कुटुंबीयांना सरंक्षण देण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. आमच्या तालुका जिल्ह्यात मोठी दहशत आहे. अनेकांचे नाव सभागृहात घेतले जात आहे.
कुटुंबीयांनी सांगितला घडलेला प्रकार…
देशमुख यांच्या कुटुंबीय शरद पवार यांना म्हणाले की, एक 5 ते 6 किमी अंतरावर एक गाव आहे. तिथे आमच्या गावातील तरुण वॉचमन म्हणून काम करतो, त्याला मारहाण झाल्याने त्यांनी सरपंचाना फोन केला यावेळी आमच्या गावातील लोकं तिथे गेले. त्या लोकांना तेथून काढून देण्यात आले. त्यानंतर 3 दिवसांनी त्यांना अडवून त्यांना उचलून नेण्यात आले. यानंतर त्यांची हत्या झालेची माहिती शरद पवारांना दिली.