सराईत गुन्हेगार आणि चोरीची वस्तू खरेदी करणारा नेरळ पोलिसांच्या ताब्यात.नेरळ पोलिसांचे होतेय कौतुक….

Spread the love

*नेरळ : सुमित क्षिरसागर –* नेरळ परिसरात दिवसाढवळ्या चोरी करण्याऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात नेरळ पोलिसांना यश आले असून चोराने लुटलेल्या वस्तू खरेदी करणाऱ्यास देखील नेरळ पोलिसांनी अटक केली आहे.शफिक उर्फ टोपी अब्दुल शेख असे चोरट्याचे नाव असून तो भिवंडी येथे राहणारा आहे.तसेच चोरीच्या सोन्याचे दागिने खरेदी विक्री करणारा आरोपी रमेश गोपाल सोनी याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याने, गोरख व्यवसाय चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.दरम्यान पकडलेल्या दोन्ही आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून ते सराईत असल्याचे आता समोर आले आहे.


          

नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पियुष अपार्टमेंट मध्ये १४/११/२०२४ रोजी भर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास चोरी झाली होती.तक्रार दार संतोष हिंमतराव कोळी यांच्या घरातील सोने,चांदीचे तसेच रोख रक्कम असा ऐकून पाच लाखाच्या आसपास मुद्देमाल अज्ञात चोरट्याने पळून नेला होता.याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी चोराला पकडण्यासाठी मोठे शर्तीचे  प्रयत्न सुरू केले होते यासाठी एक गुन्हे प्रकटीकरण पथक देखील नेमण्यात आले होते.यावेळी नेरळ शहर व चोरीच्या मार्गातील ४० ते ५० सी.सी.टिव्ही फुटेज आणि तांत्रिक आधारे घटनेचा शोध नेरळ पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकाने घेतला असता गुन्हयातील आरोपी हा भिवंडी येथील राहणारा असल्याचे समोर आले.दरम्यान 46 वर्षीय आरोपी शफिक उर्फ टोपी अब्दुल शेख याला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील काप तलावाच्या बाजूला असणाऱ्या क्वार्टर गेटचे मागे, घुगटनगर, घर नंबर .३०२ येथून पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.यावेळी आरोपीकडून आतापर्यंत १,२९,७००/- रूपये किमतीचे २६.२०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे.या गुन्हातील आरोपी यांचे गुन्हेगारी पार्श्वभुमी तपासली असता आरोपी शफिक उर्फ टोपी अब्दुल शेख याचे विरूध्द यापूर्वी ,१८ घरफोडी चोरीचे गुन्हे व रमेश गापोल सोनी याचेवर ६ चोरीचे मालमत्ता घेण्याचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. हे गुन्हे उघडकीस आणणाऱ्या नेरळ पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे आणि नेरळ प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदिप फड,पोलीस हवालदार सचिन वाघमारे, पोलीस शिपाई राजेभाउ केकाण, अश्रुबा बेंद्रे, निरंजन दवणे,विनोद वांगणेकर यांनी केलेली उत्कृष्ठ कामगिरीचे कौतुक होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page