*श्रीकृष्ण खातू / संगमेश्वर-* संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माभळे घडशीवाडी या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान राबविले. या अभियानात शाळेने तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवल्याने या शाळेला दोन लाख रुपयांचा निधी बक्षीस म्हणून दिला जाणार आहे. त्यामुळे शाळेला चहुबाजूंकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
माभळे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माभळे घडशीवाडी ही शाळा इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत आहे. या शाळेची पटसंख्या ४१ असून अभियानाच्या माध्यमातून शाळेचा प्रभावी विस्तार करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा, शासन अंमलबजावणी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता करण्यासोबत, शाळेत अद्यावत तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर, विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, विद्यार्थ्यांसाठी ज्यादा समयदान वर्ग, विविध कार्यानुभात्मक उपक्रम, महावाचन, इको क्लब फॉर मिशन लाईफ, शिक्षण सप्ताह, आनंददायी शनिवार, स्वच्छता मॉनिटर, कला क्रीडा गुणांचा विकास, शासकीय योजनांचा लाभ, अशा विविध उद्दिष्टांवर काम करत तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळवला आहे .
यासाठी संगमेश्वरचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, केंद्रप्रमुख दिलीप जाधव, बीआरसी तज्ञ, शिक्षक यांचे सहकार्य लाभले. अभियानाच्या यशस्वीतेसाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नेहा भोसले, सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ, पालक, मुख्याध्यापिका श्वेता संसारे, व सहकारी शिक्षक शिवप्रसाद गड्डमवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
याशिवाय विशेष घडशीवाडीतील गावकर कृष्णा घडशी, काष्टेवाडी गावकर सुजित काष्टे,सोमा घडशी,सदस्य भिकाजी घडशी, चंद्रकांत काष्टे किरण भोसले, विनायक काष्टे, रोणीत जोशी,शरद काष्टे,अनिल भिडे,दीपक भिडे,शंकर जोशी,मनोहर गीते,माधवी गीते, यांनी सर्वांच्या सहकार्याने शैक्षणिक उठाव करून रात्रंदिवस मेहनत घेतली होती.