मुंबई | फेब्रुवारी २८, २०२३.
गृह विभागातर्फे राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनेक दिवसांपासून बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या ८ आयपीएस अधिकाऱ्यांना अखेर पोस्टिंग मिळाली आहे. त्यामध्ये आयपीएस बिपिन कुमार सिंह यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आयपीएस प्रभात कुमार यांना होमगार्डची जबाबदारी देण्यात आली आहे. इतर अधिकाऱ्यांना साईड पोस्टिंग देण्यात आल्या आहेत. राज्यातील एकूण ११ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह मंत्रालयाने जारी केले आहेत.
कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली
आयपीएस बिपिन कुमार सिंह यांची मुंबई येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आयपीएस प्रभात कुमार यांची अपर पोलीस महासंचालक व उपमहासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र, मंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
विनीत अग्रवाल यांची अपर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी, म्हाडा, मंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राजकुमार व्हटकर यांची विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र, मंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
जय जाधव यांची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी मंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कैसर खालिद यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
डी. के. पाटील भुजबळ यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एस.एच. महावरकर यांची नांदेड विभागाच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अभिजीत शिवथरे यांची कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहायक पोलीस महानिरीक्षकपदी मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच पौर्णिमा चौगुले यांची मीरा-भाईंदर-वसई-विरारच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राहुल खाडे यांची बदली जालना जिल्ह्याच्या अपर पोलीस अधिक्षकपदी करण्यात आली आहे.
नीवा जैन यांची अपर निवासी आयुक्त, सचिव व निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, यांचे कार्यालय, नवी दिल्ली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.