रिषभ पंत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; लखनऊ सुपर जायंट्सनं २७ कोटी रुपयांना केलं खरेदी..

Spread the love

मुंबई- आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाचा पहिला तास खूपच रोमांचक होता. सुरुवातीला कोलकाता नाइट रायडर्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाब किंग्जनं 26.75 कोटी रुपयांना विकत घेतलं. मात्र काही वेळातच हा विक्रम मोडला गेला.

यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. रिषभ पंतला लखनऊ सुपर जायंट्सनं 27 कोटी रुपयांना खरेदी केलं. दिल्ली कॅपिटल्सनं राईट टू मॅचचा प्रयत्न केला, पण लखनऊनं लगेचच त्यांची रक्कम वाढवली. मग दिल्लीनं हात वर केले. अशाप्रकारे लखनऊनं रिषभ पंतला 27 कोटी रुपयांमध्ये विकट घेतलं.

गेल्या वर्षी कोलकात्याला चॅम्पियन बनवणाऱ्या श्रेयस अय्यरला आयपीएल २०२५ च्या लिलावात मोठी रक्कम मिळाली. अय्यरला पंजाब किंग्जनं 26.75 कोटी रुपयांना विकत घेतलं. आता रिषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असून श्रेयस अय्यर हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या संघानं रिटेन केलं नव्हतं. केकेआरनं श्रेयस अय्यरला सोडलं तर रिषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सनं सोडले. आता अय्यरला पंजाब किंग्जनं 26.75 कोटींना तर रिषभ पंतला लखनऊनं 27 कोटींना विकत घेतलं आहे. या दोन्ही खेळाडूंना संघाचं कर्णधारपद मिळू शकतं, असं मानलं जात आहे.

इंग्लंडचा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरला विकत घेण्यासाठी अनेक संघांमध्ये स्पर्धा होती. मात्र, अखेरीस गुजरात टायटन्सनं या स्टार सलामीवीराला 15.75 कोटींना विकत घेतले. गेल्या मोसमापर्यंत बटलर राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. लखनऊ सुपर जायंट्सनंही जोस बटलरला खरेदी करण्यासाठी मोठी बोली लावली. लखनऊ आणि गुजरातमध्ये घनघोर युद्ध झालं. मात्र, अखेरीस बटलरला विकत घेण्यात गुजरातला यश आलं. लखनऊनं या खेळाडूसाठी 15.25 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली होती. पण गुजरात टायटन्सनं आधीच या खेळाडूला विकत घेण्याचा विचार केल्याचं स्पष्टपणे दिसत होतं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page