युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; मॉस्कोवर डागले 34 ड्रोन; विमान सेवेवर परिणाम…

Spread the love

*कीव-* युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केलेला आहे. युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोवर डझनावारी ड्रोन हल्ले केले आहेत. ज्यात अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त असून हल्ल्याने विमान सेवेवर देखील मोठा परिणाम झाला असून अनेक विमाने वळविण्यात आली आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार युक्रेनने मॉस्कोवर किमान 34 ड्रोनद्वारे हल्ले केले आहेत.

हा साल 2022 मधील युद्धानंतरचा युक्रेनचा रशियाची राजधानीवर झालेला सर्वात मोठा ड्रोन हल्ला म्हटला जात आहे. हल्ल्यामुळे शहरातील तीन प्रमुख विमानतळावरील उड्डाणांना डायवर्ट करावे लागले आहे. आणि किमान एक जण जखमी झाला आहे. रशियन वायू सेनेने रविवारी तीन तासांत पश्चिम रशियाच्या अन्य क्षेत्रात 36 ड्रोन नष्ट केल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. रशियन संघ क्षेत्रात विमानाच्या सारखे ड्रोन वापरुन दहशतवादी हल्ला करण्याचा युक्रेन सरकारचा प्रयत्न निष्प्रभ केल्याचे रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

रशियन टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेल्या अन ऑफीशयली व्हिडीओत ड्रोन आकाशात उडताना दिसत आहेत. युक्रेनच्या हल्ल्यानंतर डोमोदेवो, शेरेमेटेवो आणि झुकोवस्की विमानतळातील 36 फ्लाईट्सना डायवर्ट करण्यात आले आहे.त्यानंतर पुन्हा विमान सेवा बहाल करण्यात आल्याचे रशियन फेडरल एअर ट्रान्सपोर्ट एजन्सीने म्हटले आहे. मॉस्को क्षेत्रात एक व्यक्ती या हल्ल्यात जखमी झाल्याची बातमी आहे. रशियाने रातोरात रेकॉर्ड 145 ड्रोन लॉंच केल्याचे युक्रेनने म्हटले आहे. आमच्या हवाई सुरक्षा यंत्रणे त्यातील 62 ड्रोन नष्ट केल्याचे युक्रेनने म्हटले आहे. आम्ही रशियाच्या ब्रांस्क परिसरातील एका शस्रभांडावर हल्ला केल्याचे युक्रेनने म्हटले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page