संगमेश्वर/प्रतिनिधी- सावर्डे येथे दहशतवाद विरोधी पथकाकडून कारवाई झालेल्या संशयित आरोपी पाटणकर याचे संगमेश्वर परिसरातील दुकान संबंधित केसचा निकाल लागेपर्यंत बंद करण्यात यावे याबाबतचे निवेदन संगमेश्वर व्यापारी संघ आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने संगमेश्वर पोलिसांना देण्यात आले आहे .
या निवेदनात असे म्हटले आहे की सावर्डे येथील पाटणकर याचे संगमेश्वर सह्याद्री पॅलेस येथे चायनीज हॉटेल आहे परंतु या व्यक्तीवर दहशतवाद विरोधी पथकाने जी कारवाई केली आहे या अर्थी सदर व्यक्ती व्यवसायातून मिळवलेला पैसा हा देश विरोधी कारवाई करता करीत आहे.त्यामुळे या व्यक्तीला संगमेश्वर येथील व्यवसाय सदर केसचा निकाल लागेपर्यंत सदर व्यक्तीचा व्यवसाय बंद ठेवावा व सदर व्यक्ती दोषी आढळल्यास सदर व्यवसाय कायमचा बंद करावा असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर संगमेश्वर व्यापारी संघ तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संगमेश्वर विभाग पदाधिकारी आणि सदस्यांच्या सह्या आहेत.