चेन्नई- तामिळनाडूत आज शुक्रवारी रात्री भीषण रेल्वे अपघात झाला असून, यात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बागमती एक्सप्रेस ही मालगाडीला धडकली व त्यानंतर बोगींना आग लागली. तसंच काही बोगी रुळावरुन घसरल्या आहेत. म्हैसूरहून दरभांगाकडे जाणाऱ्या बागमती एक्स्प्रेसला तामिळनाडूतील कावरपेट्टाई रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला.
तामिळनाडूत शुक्रवारी रात्री भीषण रेल्वे अपघात झाला. बिहारला जाणाऱ्या बागमती एक्स्प्रेसचे सहा डबे मालगाडीला धडकल्याने रुळावरून घसरले. हा अपघात ऐवढा भीषण होता की, रेल्वेच्या काही डब्यांना आग लागली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही रेल्वे म्हैसूरहून पेरंबूरमार्गे बिहारमधील दरभंगाकडे जात होती. दरम्यान, तिरुवल्लूरजवळील कवरप्पट्टाई रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीला ही रेल्वेगाडी जाऊन धडकली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. कर्मचाऱ्यांनी बचवकार्यास सुरुवात केली आहे. रुग्णवाहिका आणि एनडीआरएफची पथकेही घटनास्थळी दाखल झाली आहेत.
या दुर्घटनेबाबत अधिक माहिती देताना दक्षिण रेल्वेने सांगितले की, म्हैसूरहून दरभंगाकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक १२५७८ (एमवायएस-डीबीजी) चे सहा डबे रात्री १०.३० च्या सुमारास मालगाडीला धडकून रुळावरून घसरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर काही जण जखमी झाले आहेत. चेन्नई सेंट्रलयेथून मेडिकल रिलीफ व्हॅन आणि बचाव पथके रवाना झाली आहेत. मालगाडी ही रेल्वे स्थानकावर थांबली होती. त्याचवेळी म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेस जोरात आली आणि थांबलेल्या मालगाडीला थडकली. ही धडक इतकी जोरात होती की लगेच काही बोगींना आग लागली व काही बोगी या रुळावरुन घसरल्या. यात अनेक प्रवासी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.