महाराष्ट्रातील सर्वात मोठा “नमो रमो नवरात्री” उत्सवाचे आयोजन – आमदार,सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण…

Spread the love

आमदार,सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

*डोंबिवली ,ठाणे, प्रतिनिधी- दबाव वृत्तसेवा :* मुंबई आणि महाराष्ट्रात डोंबिवलीचा “नमो रमो गरबा” आता फार प्रसिद्ध झाला आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून डोंबिवलीची कीर्ती सर्वत्र आहेच. पण गेली काही वर्ष “नमो रमो नवरात्री” या नावाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा नवरात्री उत्सवही डोंबिवलीतच साजरा केला जातो त्यात जगप्रसिद्ध गरबा कलाकार येण्यास उत्सुक असतात. यंदा गरबा क्वीन या विशेषणाने संबोधली जाणारी गीताबेन रबारी पुन्हा एकदा नवरात्रीचे नऊ दिवस आपल्या *“नमो रमो नवरात्रीचा”* उत्सव रंगतदार करण्यास येणार आहे सोबत ख्यातनाम गरबा गायक निलेश गढवी यांची साथ त्यांना लाभणार आहे. नमो रमो नवरात्रीचे आयोजन ३ ते १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सावळाराम महाराज क्रीडा संकुल, घरडा सर्कल, डोंबिवली पूर्व. येथे करण्यात आले आहे. यावर्षी संपूर्ण वातानुकूलित ७० हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये सर्वात मोठ्या १३५ फूट बाय ५०० फूट अशा भव्य एसी डोमची निर्मिती करण्यात आली आहे.

“नमो रमो नवरात्रीची” संकल्पना रुजवणारे आणि सर्व संस्थांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहणारे डोंबिवलीचे आमदार आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र दादा चव्हाण यांच्यामुळेच हा नवरात्री उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. रविंद्र चव्हाण हे नेहमीच सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि साहित्य या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत असतात. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी “नमो रमो नवरात्री उत्सवाचे “ आयोजन मोठ्या दिमाखात करत असतात. यावर्षी देखील अतिशय भक्तिभावाने हिंदू संस्कृतीप्रमाणे श्री अंबे मातेची प्रतिष्ठापना केली गेली. दररोज सकाळ व संध्याकाळ विधिवत पूजा आरती करून महिषासुर मर्दिनीचा गजर करून देवीला नैवेद्य वाढून आवाहन केलं जातं आणि रात्री भव्य मंडपात देवीसमोर गरबा खेळला जातो. केवळ *कल्याण डोंबिवलीच नाही तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल रायगड, पालघर* तसेच संपूर्ण *महाराष्ट्रातून गरबा खेळण्यासाठी* पारंपारिक वेशभूषेत गरबा प्रेमी अवघी तरुणाई या “नमो रमो नवरात्रीत” उत्साहात सहभागी होतात.

“नमो रमो नवरात्रीच्या” स्थळाचं पावित्र्य तिथे मंडपातच उभारलेल्या अंबे मातेच्या मंदिरात आहे. आणि यंदाचं अजून एक प्रमुख आकर्षण म्हणजे मातेच्या या मंदिरात दररोज नव्या नव्या रंगांच्या ताज्या नैसर्गिक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. ख्यातनाम पुष्परचनाकार श्याम भगत यांच्यातर्फे सजावट करण्यात येणार आहे.

सालाबादप्रमाणे या वर्षीही सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक संजय धबडे ह्यांनी भव्य सेट उभारला आहे. तसेच यावर्षी पूर्ण वातानुकूलित ७० हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये *स्वस्तिक इव्हेंट्सचे अनिल पासड ह्यांनी १३५ फूट बाय ५०० फूट अशा भव्य एसी डोमची निर्मिती* केली आहे. या उत्सवामध्ये फक्त गुजराथी समाज नव्हे तर सर्व जाती आणि धर्माचे लोक मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी होतात, अशी माहिती आमदार व मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.

https://www.youtube.com/live/gzOVADDNu48?si=hwtt55A7ocgNZM66

टीटू कुलकर्णी ह्यांचा जबरदस्त साऊंड असून दरवर्षी प्रमाणे यंदाही गरबा प्रेमींना सुरक्षित, निरोगी आणि आनंदी वातावरणात गरब्याचा मनमुराद आनंद लुटता यासाठी प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर बारकाईने  विशेष लक्ष देण्यात आले आहे. म्हणूनच एसी टॉयलेट्स, अनुचित प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही आणि बाऊन्सर्सची प्रायव्हेट सिक्युरिटी या बरोबरच फूड कोर्ट, पार्किंग, सेल्फी पॉईंट्स अशी उत्तम व्यवस्था केली आहे. पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या पर्यावरण पूरक कचरा पेट्या बसविण्यात आल्या असून “जलचर जीवन वाचवा” (ॲक्वा लाईफ) ही संकल्पना त्यातून मांडली आहे.  संपूर्ण डोंबिवली परिसरात नमो रमो गरबामुळे एक अनोखी ऊर्जा वातावरणात निर्माण झाली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page