*संगमेश्वर: दिनेश अंब्रे/ २८/०९/२०२४-* एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, देवरुख यांच्या वतीने राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत संगमेश्वर रामपेठ येथे पोषण अभियान कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलिस हेड कॉन्स्टेबल योगिता बरगाळे मॅडम, पोलिस हवालदार श्री. सचिन कामेरकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्री.चंद्रकांत कांबळे, पोलिस अंमलदार गुंजन माईन उपस्थित होते. याचबरोबर नावडीचे उपसरपंच श्री. विवेक शेरे, ग्रामपंचायत सदस्या प्रतिक्षा शेरे, विशेष कार्यकारी अधिकारी अंजली कोळवणकर, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर, घे भरारी ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ. प्रिया सावंत, बचतगट बँक सखी सानिका कदम, CRP मनाली सुर्वे, सदस्य नयना शेट्ये आणि सदस्य सुप्रिया कदम यांनी हजेरी लावली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी I.C.D.S. प्रकल्प अधिकारी वंदना यादव, J.C.D.S. पर्यवेक्षिका अमृता नरोटो, प्रेरणा रावणांक यांचे विशेष सहकार्य लाभले.
सर्व ग्रामस्थ, पालक, गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, ज्येष्ठ नागरिक, तसेच नायरी व बुरंबी बीट येथील आशा सेविका उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमात पोषण रॅली, रांगोळी स्पर्धा, डोहाळे जेवण, HB तपासणी, अर्धवार्षिक वाढदिवस, पाककला स्पर्धा यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. HB तपासणीसाठी आर.एच. मधून पूजा मोरे उपस्थित होत्या.
यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्री.चंद्रकांत कांबळे व पोलिस हवालदार सचिन कामेरकर यांनी उपस्थित महिलांना सायबर क्राईम, मोबाईलपासूनचे फायदे व तोटे तसेच पुढे येणारा नवरात्र उत्सव कालावधित भजनाचा व नृत्याचा आनंद लुटावा व कायदा व सुव्यवस्था पाळावी असे मोलाचे मार्गदर्शन करताना नागरिकांना आवाहन केले
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गायत्री घडशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन वंदना यादव मॅडम यांनी केले. कार्यक्रम केंद्र शाळा संगमेश्वर नं. २ (रामपेठ) येथे पार पडला.