दिल्ली /प्रतिनिधी- दिल्लीतील सर्व सात लोकसभा मतदारसंघात अठराव्या शतकापासून पासून ते वर्तमानात प्रशासकीय सेवेत असणारे मराठी कुटुंबं राहत आहेत. मराठी समाजाची दिल्ली राज्यात सुमारे ४.५ ते ५ लाख लोकसंख्या आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, अध्यात्मिक अश्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे ४० संस्था दिल्लीतील विविध भागामध्ये कार्यरत आहेत. सदर संस्थाच्या माध्यमातून मराठी समाज संघटित आहे. दिल्ली राज्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय मेमोरियल समितीचे भवन, वनिता समाज भवन, दोन मराठी समाजाच्या शाळा, विठ्ठल – रुखमाई मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, विविध भागात गणेश उत्सव मंडळे आहेत. श्री गणेश सेवा मंडळ दिल्ली (लक्ष्मी नगर) आयोजित “दिल्लीचा महाराजा” गणेश उत्सव मागील २३ बर्षे हाय- टेक सजावट मंडपात साजरा केला जात असून खूप मोठया संख्येने भाविक व व्हीआयपी दर्शनाचा लाभ घेतात.
सदर उत्सवाचे संस्थापक तथा मुख्य आयोजक मुळ रहिवासी लातूरचे श्री. महेंद्र लड्डा आहेत.सोने-चांदी बाजारात मराठी समाजाचे मोठे प्राबल्य आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत दिल्लीतील सर्व सात लोकसभा मतदार संघातील मराठी बांधवामध्ये भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मराठी समाज मुख्य समन्वयक म्हणून दिल्ली भाजप प्रदेश अध्यक्ष श्री. वीरेंद्र जीं सचदेवा यांनी मला जबाबदारी दिली होती.
दिल्लीतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील सर्व मराठी वसाहतीमध्ये नियोजनबद्ध व रचनात्मक पद्धतीने प्रचार करण्यात आला. लोकसभा निवडणूकित दिल्लीतील मराठी समाजाने भाजपला भरभरून मतदान केले. संपूर्ण निवडणूकितील सदर कामकाजाचा रीतसर अहवाल भाजप प्रदेश अध्यक्षाना सादर करण्यात आला. त्यातून मराठी समाजाचे अस्तित्व तथा निवडणूकितील महत्व दिल्ली भाजप प्रदेशाच्या निदर्शनास आले.
त्यामुळे दिल्ली भाजप प्रदेश अध्यक्षानी नुकतीच भाजप मराठी मोर्चाची निर्मिती केली आणि लोकसभा निवडणूक काळातील माझे सहकारी श्री. महेंद्र लड्डा यांना प्रभारी व दिल्ली प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री. नितीन सरदारे यांना संयोजक अशी जबाबदारी देण्यात आली आहे. आपण केलेल्या नियोजनबद्ध कामाची हिच तर खऱी पोचपावती आहे. सदर मराठी मोर्चा गठीत केल्यामुळे भाजप दिल्ली प्रदेश कार्यालयात दिल्लीतील मराठी समाजाला एक हक्काचे स्थान प्राप्त झाले असल्याने सर्व मराठी समाजात आनंदाचे वातावरण आहे.