बिग बॉस मराठी १०० दिवसांचा नाही तर केवळ ७० दिवसांचा…

Spread the love

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व २८ जुलै रोजी सुरू झाले, या दिवशी या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर पार पडला आणि अवघ्या महाराष्ट्रात या शोची चर्चा सुरू झाली. बिग बॉस मराठीच्या चाहत्यांनी आपापला आवडता स्पर्धक निवडला आणि त्याला या खेळात टिकवून ठेवण्यासाठी प्रेक्षकांनीही शर्थीचे प्रयत्न केले. बिग बॉस मराठीच्या घरात १०० दिवस आवडत्या स्पर्धकाने टिकून राहावे, अशी या प्रत्येक चाहत्याची इच्छा होती. असे इच्छा बाळगणाऱ्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेले काही दिवस ज्या गोष्टीची चर्चा होती, तेच खरे ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

काही कारणास्तव बिग बॉस मराठी १०० दिवस नव्हे तर केवळ ७० दिवसात संपेल असे बोलले जात होते. २८ जुलैपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे ५ ऑक्टोबर रोजी ७० दिवस पूर्ण होत आहेत आणि त्या वीकेंडला ‘बिग बॉस मराठी सीझन ५’चा ग्रँड फिनाले पार पडेल, असे अपडेट बिग बॉस मराठीविषयी अपडेट देणाऱ्या विविध सोशल मीडिया पेजवरुन शेअर करण्यात आले होते. आता याविषयी अधिकृत माहिती समोर आली असून, या वृत्तावर शिक्कामोर्तबच झाले आहे.

कलर्स मराठी वाहिनीच्या वरिष्ठ अधिकारी सुगंधा लोणीकर यांनी अशी माहिती दिली की, बिग बॉस ७० दिवसातच निरोप घेणार आहे. हा अचानक घेतलेला निर्णय आहे आणि याबद्दल कोणालाच कल्पना नव्हती असल्याचे त्या म्हणाल्या. लोणीकर यांनी असे म्हटले की, ‘स्पर्धकांना आजच्या एपिसोडमध्ये ही माहिती देण्यात आली आहे,

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page