तळगावमध्ये उबाठाला खिंडार… निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी केला भाजपमध्ये  प्रवेश….

Spread the love

*कुडाळ/प्रतिनिधी-:* माजी खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव गावातील उपसरपंचसह उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे प्रवेश केला या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे तळगाव गावातील उबाठा शिवसेनेला भगदाड पडले आहे.मालवण तालुक्यातील तळेगाव येथील उभाटा शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे भेट घेतली आणि गेल्या दहा वर्षात तळेगाव गावाचा कोणत्याही प्रकारचा विकास झाला नसल्याचे खंत व्यक्त करून गावातील प्रत्येक वाडीमध्ये विकासाची गंगा गेली पाहिजे अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे हा प्रवेश भाजपचे कुडा मालवण विधानसभा प्रभात युवा माजी खासदार निलेश राणे यांनी घेतला

यावेळी तळगाव उपसरपंच संतोष पेडणेकर, जयवंत दळवी, चारुहास दळवी, मुरारी टेमकर, तळेगाव ग्रामपंचायत सदस्य श्वेता पेडणेकर, धोंडी दळवी, सुरेंद्र दळवी, एकनाथ तळेगावकर, केशव सहदेव तळेगावकर, अशोक दळवी, विजय राऊळ, अशोक दळवी, राजू सावंत, महेश फाले, अरुण वालावलकर, सुधाकर तळेगावकर, राजू राणे, सागर फाले, यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब मंडळ अध्यक्ष दादा साईल, भाजप प्रदेश सदस्य संध्या तेरसे, जगदीश चव्हाण, निलेश तेंडुलकर, विजय कांबळे,आधी उपस्थित होते.

यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षांमध्ये तळगाव गावामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही म्हणूनच यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून तळगाव गावचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करू. कधीही निराश होऊ देणार नाही दहा वर्ष खासदार राहिलेल्या विनायक राऊत यांनी आपल्या गावाचाही विकास केला नाही म्हणूनच आज शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page