*देवरूख-* परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरेपार्क (परळचा राजा) या मंडळाकडून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा देवरुख पर्शरामवाडीला बत्तीस इंची एलइडी टि.व्ही. दोन कपाटे, सहा खुर्चा व दहा रत्नागिरी हापूस आंबा कलमेआणि अंगणवाडीसाठी एक कपाट मिळाले. त्याबद्दल देवरुख पर्शरामवाडीतील सर्व ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी मंडळाचे मनापासून आभार मानले.
माजी केंद्रप्रमुख मोहन कनवजे सरांच्या मार्गदर्शनातून शाळेचे पदवीधर शिक्षक श्री. लक्ष्मण झोरे सरांनी पाठपुरावा करून शाळेला ५०,०००/- रुपये किंमतीचे शालेय उपयोगी साहित्य मिळवले. सततचा पाठपुरावा आणि हातीव गावासाठी १०० देशी वृक्ष लावण्यासाठी जागेचा शोध, वृक्षांची उपलब्धता, उत्तम नियोजन याबद्दल परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरेपार्क (परळचा राजा) या मंडळाकडून लक्ष्मण झोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शाळेच्या गुणवत्तेबद्दल, विविध उपक्रमाबद्दल लक्ष्मण झोरे यांनी मंडळाला माहिती दिली. शाळेच्या विविध उपक्रमाबद्दल, गुणवत्तेबद्दल मंडळाच्या सदस्यांनी शाळेचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला मुंबईहून मंडळाचे अध्यक्ष अभिषेक परब, सरचिटणीस विनोद कदम, खजिनदार सुरेश आरोंदेकर, माजी अध्यक्ष शिरोडकर, मंडळाचे सर्व सदस्य, सृष्टीज्ञान संस्थेच्या श्रीम.संगिता खरात, साळुंखे मॅडम हजर होत्या. या कार्यक्रमाला गावकर चंद्रकांत पर्शराम, संजय पर्शराम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पर्शराम, उपाध्यक्ष श्रीम. वृषाली करंडे सर्व सदस्य, माजी अध्यक्ष प्रभाकर पर्शराम, वरची वाडीप्रमुख नारायण पर्शराम, ग्रामस्थ वैभव पर्शराम, दत्ताराम करंडे, अनंत कडसडे आणि पालक मोठ्या संख्येने हजर होते. शाळेला मिळालेल्या साहित्याबद्दल मुख्याध्यापक महावीर कांबळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कलमांना खड्डे खणण्यासाठी सुरेश आग्रे, संजय अडबल, संतोष अडबल, संकेत पर्शराम यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार झोरे सरांनी मानले.