खुशखबर! आता मुलांना मिळणार 75,000 रुपयांपर्यंत शिष्यवृ्त्ती! …… जाणून घ्या HDFC ची परिवर्तन स्कॉलरशीप काय आहे?….शिष्यवृत्तीचे स्वरुप काय आहे?….

Spread the love

एचडीएफसीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांपासून ते 75 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. एचडीएफसी बँक परिवर्तन एज्युकेशनल क्रायसिस स्कॉलरशीप सपोर्ट (ईसीएसएस) प्रोग्राम (HDFC Bank Parivartan’s Educational Crisis Scholarship Support (ECSS))असे या शिष्यवृत्तीचे नाव आहे.

समाजातील वंचित घटकांना शिक्षण मिळावे या उद्देशाने ही शिष्यवृत्ती चालू करण्यात आली आहे. पहिल्या वर्गापासून ते इयत्ता 12 पर्यंत तसेच  पदविका, आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्युत्तर पदवी अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.

वैयक्तिक  तसेच कौटुंबिक अडचणींमुळे शिक्षणाचा खर्च न करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत दिली जाते. शिक्षणाचा आर्थिक खर्च परवडू न शकणारे विद्यार्थी शिक्षणाच्या साखळीतून बाहेर पडू नये, त्यांनी अर्धवट शिक्षण सोडू नये हा या शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश आहे.

🔹️शिष्यवृत्तीचा लाभ कोणाला मिळेल? अटी काय?

या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर आहे. एचडीएफसी बँकेच्या या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचा असेल तर तुम्ही अटीचीं पूर्तता करणे गरजेचे आहे. भारतीय नागरिकता असणारेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. विद्यार्थी सध्या इयत्ता पहिली ते 12, पदविका, आयटीआय, पदवी, पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमात शिकत असावा.

विद्यार्थ्याने याआधीच्या इयत्तेत कमीत कमी 55 टक्के गुण मिळवलेले असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. गेल्या तीन वर्षांपासून जे विद्यार्थी वैयक्तिक तसेच कौटुंबिक पातळीवर अडचणींचा सामना करत आहेत आणि पुढे शिक्षण पूर्ण करू शकणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.

🔹️कोणत्या विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळणार?

▪️इयत्ता 1 ते इयत्ता 6 वीत शिकणारे विद्यार्थी- 15 हजार रुपये

▪️इयत्ता 7 वी ते 12, पदविका, आयटीआय, पॉलिटेक्निकचे शिक्षण घेणारे विद्यार्थी- 18 हजार रुपये

▪️पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी- 30 हजार रुपये

▪️पदवीचे (व्यावसायिक) शिक्षण घेणारे विद्यार्थी- 50 हजार रुपये

▪️पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी-  35 हजार रुपये

▪️पदव्यूत्तर पदवीचे (व्यावसायिक) शिक्षण घेणारे विद्यार्थी-  75 हजार रुपये

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page