*जळगाव:-* महाराष्ट्रातील 40 पर्यटकांसह (Maharashtra News) निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये (Nepal Accident) भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात राज्यातील 14 प्रवाशांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. हे सर्व भाविक भुसावळचे आहे. यामध्ये 31 जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीपात्रात बस कोसळल्यामुळे बचावकार्य आव्हानात्मक झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील रणगाव, पिंपळगाव, तळवेल, या गावातले सर्व भाविक होते. घटनेची माहिती मिळताच गावात अतिशय शोकाकूल वातावरण आहे. गावातील भाविक हे 16 ऑगस्टपासून अयोध्या नेपाळ काठमांडू देवदर्शनासाठी गेले होते. 16 ते 28 ऑगस्टपर्यंत असा यांचा प्रवास होतो.एकूण दोन लक्झरी बस नेपाळला गेल्या होत्या. गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांनी टाहो फोडला आहे.