*रत्नागिरी-* रत्नागिरी तालुक्यातील पाली-पाथरट येथे आज गुरूवारी सकाळी ५.४५ वाजण्याच्या दरम्यान पाली येथील पाथरथ मावळटवाडी येथे राहणारे सुभाष शांताराम धाडवे यांची आई इंदिरा शांताराम धाडवे वय ७५ वर्षे यांच्यावर दडी मारून बसलेल्या बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात इंदिरा धाडवे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पाली येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
इंदिरा धाडवे यांचा मुलगा सुभाष बाजूला चुलीजवळ पाणी तापवत होता. त्यामुळे त्या वाचल्या कारण तत्काळ पेटलेले लाकूड घेऊन गेल्याने बिबट्या पळून गेला. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात इंदिरा धाडवे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने मुलगा आणि इतर माणसं बाजूलाच असल्यामुळे इंदिरा धाडवे यांचा जीव वाचला असला तरी त्यांच्यावर बिबट्याने गंभीररित्या जखमा केल्या आहेत.