काेलंबियातील ड्रग तस्कराच्या मुलीपासून राहूल गांधी यांना 19 वर्षांचा मुलगा आणि 15 वर्षांची मुलगी??.. “ब्लिटझ” या आंतरराष्ट्रीय प्रकाशनात प्रसिध्द झालेल्या एका लेखामुळे प्रचंड खळबळ….
*नवी दिल्ली :* ब्लिटझ या आंतरराष्ट्रीय प्रकाशनात प्रसिध्द झालेल्या एका लेखामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. काेलंबियातील ड्रग तस्कराच्या मुलीपासून काॅंग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना 19 वर्षांचा मुलगा आणि 15 वर्षांची मुलगी असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. अनेक पुराव्यांसह ब्लिटझचे संपादक असलेल्या सलाहउद्दीन शोएब चौधरी यांनी हा लेख लिहिला आहे.
ब्लिटझमध्ये केलेल्या दाव्यानुसार राहूल गांधी केंब्रिज विद्यापीठांतर्गत ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिकत असताना कोलंबियात ड्रग व्यवसाय चालविणाऱ्या एका तस्कराची मुलगी असलेल्या नेत्याची मुलगी वेरोनिक कार्टेलीशी त्यांचे प्रेमसंबंध झाले. त्याची त्या वेळी खूप चर्चाही झाली हाेती. मीडिया रिपोर्ट्समध्ये 2000 मध्ये त्यांचे नाते संपुष्टात आल्याचा दावा केला गेला. मात्र, , राहुल गांधी यांनी 2004 मध्ये इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकार वृंदा गोपीनाथ यांच्या मुलाखतीदरम्यान कबूल केले की त्यांच्या मैत्रिणीचे नाव वेरोनिक आहे. वेराेनिक स्पॅनिश वंशाची आणि व्यवसायाने वास्तुविशारद असल्याचे राहूल गांधी यांनी सांगितले. मात्र, वेराेनिक स्पॅनिश नव्हे तर काेलंबियन असल्याचे पुढे आले. विशेष म्हणजे 1998 मध्ये राहूल गांधी यांच्या आई साेनिया गांधी यांनी दिल्लीमध्ये पहिली सभा घेतली. या सभेत वेराेनिक उघडपणे राहूल गांधी यांच्यासाेबत दिसली हाेती. त्यानंतरही परदेशात ते अनेकदा भेटत असल्याचे माध्यमांतून प्रसिध्द झाले हाेते.
अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप या बेटांवर राहूल गांधी अनेकदा सुट्टीसाठी जातात. याठिकाणीही वेराेनिक त्यांच्यासाेबत हाेती. मात्र, आपली खरी ओळख लपविण्यासाठी राहुल गांधी राहुल विंची हे नाव वापरत हाेते तर वेराेनिक जुआनिता विंची या नावाने वावरत हाेती. काॅंग्रेस पक्षात सक्रीय झाल्यावर राहूल गांधी यांनी वेराेनिकशी लग्न करण्याचा विचार साेडून दिला. कारण त्यांच्या वडीलांनीही परदेशी महिलेशी लग्न केले हाेते. राहूल यांनीही परदेशी मुलीसाेबत लग्न केले तर गांधी परिवार भारतीयांच्या मनातून उतरेल अशी भीती काॅंग्रेसच्या नेत्यांना वाटत हाेती. मात्र, राहूल यांच्यासाेबत वेराेनिकचे संबंध सुरूच राहिले. त्यांना न्याक विंची नावाचा एक मुलगा असून ताे आता 19 वर्षांचा आहे. तसेच मिनिक विंची ही मुलगी 15 वर्षांची आहे. जरी राहुल आणि कार्टेलीने अधिकृतपणे त्यांच्या लग्नाची नोंदणी केली नसली तरी मुलांना त्यांच्या वडिलांचे आडनाव, “व्हिन्सी” असे लावले आहे.
ब्लिट्झच्या अनेक देशांतील टीमने केलेल्या संशाेधनात राहूल गांधी यांच्या महाविद्यालयीन जीवनातील काही मैत्रीणींची नावेही उघड केली आहेत. राहुल गांधींचे विद्यार्थीदशेत नोआल झहेर नावाच्या अफगाण महिलेशी प्रेमसंबंध हाेते.ती अफगाणिस्तानचे राजे मोहम्मद जहीर शाह यांची नात आहे. त्यांनी 1933 ते 1973 पर्यंत अफगाणिस्तानवर राज्य केले हाेते. त्यामुळे तिला प्रिन्सेस म्हणजे राजकुमारी म्हटले जायचे. नोअलचे वडील प्रिन्स मुहम्मद दाऊद पश्तुनयार खान यांचे शिक्षण काबूलमधील एस्तेकलाल हायस्कूल आणि मिलिटरी अकादमीमध्ये झाले. ते रॉयल अफगाण हवाई दलात हाेते. नोआलची आई, राजकुमारी फातिमा बेगम 2005 पासून रोममधील अफगाण दूतावासात प्रथम सचिव (प्रोटोकॉल, आर्थिक व्यवहार आणि जनसंपर्क) म्हणून काम करत हाेती. प्रिन्सेस नोअलसोबत राहुल गांधींच्या प्रेमसंबंधांची माहिती देणाऱ्या लेखाची लिंक ITI Times ने काढून टाकली आहे. कारण एका प्रतिष्ठित व्यवस्थापन कंपनीने त्यासाठी दबाव आणला. द संडे गार्डियनने २०१२ मध्ये प्रसिद्ध केलेला आणखी एक लेखडी काढून टाकण्यात आला आहे, असे ब्लिटझने म्हटले आहे.
प्रिन्सेस नोआलने लग्नाच्या तयारीसाठी इस्लाम सोडून रोमन कॅथोलिक ख्रिश्चन धर्म स्वीकारला. राहुल गांधी अनेकदा नोआलसोबत सोनिया गांधींच्या इटलीतील होम चॅपलमध्ये प्रार्थना करत असत.राहुल आणि नोआल यांच्यातील संबंध ती गरोदर राहिल्यानंतर बिघडले. राहुलने तिचा गर्भपात करण्याचा आग्रह धरला. यामुळे नोअलला खूप माेठा धक्का बसला. त्यामुळे तिने विश्वासघातकी असा आराेप करत राहूल गांधींशी असलेले संबंध ताेडून टाकले. 2013 मध्ये इजिप्शियन प्रिन्स मुहम्मद अली यांच्याशी नाेअलने लग्न केले,असे ब्लिटझने म्हटले आहे.