भारतीय जनता पार्टी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची यशस्वी मध्यस्थी..
*रत्नागिरी, प्रतिनिधी-* मुंबई गोवा हायवेवर जे एम म्हात्रे कन्ट्रक्शन कंपनीच्या मनमानी कारभार विरोधात गणेश पवार यांनी 15 ऑगस्ट ची आमरण उपोषणाचे पत्र दिले होते. त्यानुसार गणेश पवार सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय महामार्ग यांच्या विरोधात उपोषणासाठी गेले होते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपअभियंता कुलकर्णी साहेब यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला परंतु लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे गणेश पवार हे आमरण उपोषणावर ठाम होते.
भारतीय जनता पार्टीचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी राष्ट्रीय महामार्ग च्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर…
भारतीय जनता पार्टीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी राष्ट्रीय महामार्गाला धारेवर धरून सदरची कारवाई का करण्यात येत नाही कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालण्यात येते असे सांगितल्यामुळे व मुख्य अभियंत्याशी फोनवर बोलल्यानंतर तसे लेखी आश्वासन गणेश पवार यांना देतो असे सांगितल्यानंतर सदरचे आमरण उपोषण गणेश पवार यांनी स्थगित केले आहे. दिनांक 16 ऑगस्ट रोजी महामार्गाची पाहणी करायचे असून त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर साई कन्सल्टंट जे. एम. म्हात्रे कन्ट्रक्शन कंपनी व हुजूर कंट्रक्शन कंपनी, राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग व गणेश पवार हे संयुक्त पाहणी करणार आहेत. सदर पाणी मध्ये रस्त्याचे काम ज्या ठिकाणी हाती टाकण्यात आले त्याचे पाळणे करण्यात येणार असून पाहणी केल्यानंतर अहवाल वरिष्ठ कार्यालयाला कारवाईसाठी पाठवण्यात येणार आहे.
मुंबई गोवा महामार्ग चे संयुक्त पाहणी व पेमेंटचे विषय विषय लवकरच मार्गी लावणार…
पेमेंटच्या संदर्भातील लोकांचे प्रश्न असल्याने वारंवार गणेश पवार पाठपुरावा करत होते त्या संदर्भातही राष्ट्रीय महामार्गाने सकारात्मक भूमिका घेतली आहे व दोन दिवसांमध्ये पुढील कारवाई करतो असे लेखी आश्वासन दिले आहे. अधिकारी व कंपनीच्या चुकीच्या कामामुळे सरकारची बदनामी होत आहे. योग्य प्रकारे काम करून घेण्यात येत नाही त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून ही पहिलीच वेळ आहे की कंपनीच्या विरोधामध्ये कोणतीतरी कारवाई होण्यास सुरुवात झाली आहे. कंपनीच्या मनमानी कारभारीला नागरिक त्रस्त झाली असून योग्य कारवाई न झाल्यास पुढील आंदोलन राष्ट्रीय महामार्ग कोकण विभाग यांच्या सीबीडी बेलापूर येथील ऑफिसच्या समोर करण्यात येणार आहे. तूर्तास सदरचे आमरण उपोषण सकारात्मक कारवाई केल्याने स्थगित करण्यात आलेले आहे असे गणेश पवार यांनी सांगितले. सदर आंदोलनासाठी लोकांनी जे सहकार्य केले व भारतीय जनता पार्टी दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहे.