दंगल गर्ल विनेश फोगटची अंतिम फेरीत धडक, भारताचं एक पदक नक्की!…

Spread the love

भारताची कुस्तीपटू विनेश फोगटनं आज टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मंगळवारी येथे सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो वजनी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विनेशनं क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझला पराभूत केलं. या विजयानंतर तिने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून भारतासाठी सिल्व्हर पदक निश्चित केलं आहे.

*एरिस (फ्रान्स)-* विनेश फोगाटनं उपांत्य फेरीत क्युबाच्या प्रतिस्पर्धी महिलेला 5:00 ने पराभूत केले. विनेशनं पहिल्यांदा प्रतिस्पर्धी महिलेवर हल्ला चढवला. पण क्यूबाच्या कुस्तीपटूने तिचा डावा पाय पकडला. तथापि, तिने प्रतिस्पर्ध्या महिलेला कोणतेही गुण घेऊ दिले नाहीत. त्यामुळे क्यूबाच्या कुस्तीपटू महिलेला निष्क्रिय ठरविण्यात आले. विनेशने 1:30 मिनिटे शिल्लक असताना चार गुण घेतले. त्यामुळे तिने शेवटी 5:0 ने आघाडी घेतली.

विनेश फोगटनं भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) पदच्युत अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात आंदोलनांचे नेतृत्व केले. त्यामुळे तिला सोशल मीडियात सतत ट्रोल करण्यात आले. तिने टीकाकारांना आपल्या यशातून चोख प्रत्युत्तर दिले.

विनेशनं यापूर्वी उप-उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जपानच्या युई सुसाकीचा पराभव केला. शेवटच्या आठ टप्प्यात युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा 7-5 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. 48 किलो वजनाच्या गटात नंबर 1 आणि चार वेळा विश्वविजेता असलेल्या जपानच्या युई सुसाकी विरुद्ध तिने धक्कादायक विजय मिळविला होता.

*संकटावर मात करत मिळविला विजय-*

पॅरिस ऑलिंपिक खेळांपूर्वीचे जीवन विनेशसाठी खूप कठीण ठरले. कारण तिने ब्रिजभूषण शरण सिंह यांनी तरुण महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळाच्या विरोधात कुस्तीपटूंना पाठिंबा दिला होता. यापूर्वी 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला गुडघ्याच्या दुखापतीमुळे अश्रूपूर्ण निरोप घ्यावा लागला होता. तिच्या चुलत भावंडांनी आजवर राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. यापूर्वी ऑलिम्पिकनंतर तिला शिस्तभंगचे कारण देऊन निलंबितदेखील करण्यात आले होते. त्यानंतर फोगटने WFI ची माफी मागितली होती.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page