गोरक्षकांची पुन्हा धडक कारवाई कर्जत मध्ये टेंम्पो भरून गोमांस पकडले.पोलीस करतात काय?…

Spread the love

*कर्जत/ सुमित क्षीरसागर –* कर्जत तालुक्यात आज सकाळच्या सुमारास टेम्पो भरून गोमांस सापडून आलं.गोरक्ष यांनी हा टेम्पो पोलिसांना पकडून दिला,हजारो किलो गोमांस असलेला टेंम्पो बंद पडला होता.टेंम्पोला टॉय करण्यासाठी आलेल्या दुसऱ्या टेम्पोत ही हजारो किलो गोमांस वाहतूक करून पुन्हा आल्याचे सांगण्यात आलं.यामध्ये दोघांना पकडण्यात आलं.दरम्यान आठवड्या भरात तालुक्यात ही दुसरी कारवाई असून गोरक्षक यांनीच पुन्हा एकदा पुढाकार घेऊन हा गोमांस पोलिसांना पकडून दिला त्यामुळे पोलिसांच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.
       
कर्जत तालुका जसा राजकारणामुळे चर्चेत राहिला  आहे तसा तो गोवंशीय जनावरांची तस्करीसाठी सर्वाधिक चर्चेत राहिला.तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची तस्करी होत आहे,याला पोलिसांचा वरदहस्त म्हणावा की आणखी काही असा आरोप गोरक्षकांकडून नेहमीच केला जातो.तालुक्यातून गोवंशीय जनावरांची चोरी मोठया प्रमाणात वाढली असून ह्या जनावरांची कत्तल करून कटिंग केलेला गोमांस हा खाण्यासाठी इतर शहरात सर्रास पोहचवला जात असल्याचे चित्र सामोर आलं.खरं तर पोलिसांच्या मदतीने येथील कसायी धारकांना कर्जत तालुका हा गोमांस वाहतुकीसाठी आणि विक्रीसाठी सोयीस्कर बनला का म्हणून प्रश्न उपस्थित होतो,मात्र दुसरीकडे हाच तालुका गोमांस वाहतुकीसाठी केंद्र बिंदू ठरतो.


 
गुरुवार 1 ऑगस्ट रोजी  कर्जत तालुक्यातील चौक रस्त्याच्या दिशेने निघालेला MH 47 AS 3164 हा पिकअप टेंम्पो कर्जत चार फाटा या येथे बंद पडला होता.दरम्यान उपस्थित गोरक्ष आणि बजरंग दल तर शिव संघटनांना येथील तरुणांना संशय आला असता पिकअप टेंम्पची पाहणी केली असता टेंम्पो भरून गोमांस दिसून आले,यावेळी येथील टेंम्पो मधील तरुण पळून गेल्याचे सांगण्यात आलं तर एका तरुणाला पकडण्यात आले होते,दरम्यान बंद पडलेल्या पिकअप टेंम्पोला टॉय करण्यासाठी आलेला टेंम्पो  MH 03 DV 4187 देखील संशय ग्रस्त असल्याने गोरक्षकांनी चालकासह टेंम्पो ताब्यात घेतला.या टेंम्पो मधून देखील हजारो किलो गोमांस वाहतूक केल्याचे सांगण्यात येते.दरम्यान गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे आज हजारो किलो गोमांस पकडण्यात आलं आणि दोन जणांना ताब्यात घेतले.
    
टेंम्पो पकडला त्या ठिकाणी कर्जत पोलिसांची हाकेच्या अंतरावर एक पोलीस चौकी आहे,कायम येथे पोलीस तैनात असताना ह्या गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास न येता ते गोरक्षक पकडून देत असल्याने पोलिसांच्या कामावर संशय व्यक्त होतो.आठवड्या भरा पूर्वी भर पावसात याच मार्गावर एका इनोव्हा कार मध्ये सहाशे किलो गोमांस सापडले होते,यावेळी चालकाने पळून जाण्यासाठी या गोरक्षक तरुणांवर गाडी अंगावर घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता,दरम्यान गोरक्षकांनी मोठ्या जोखमेने या कासायांना पकडले.एकूणच जे काम पोलीस प्रशासनाने चोख बजावणे अपेक्षित असताना गोरक्षक आपला प्राण मुठीत घेवुन करताना दिसत आहेत.त्यामुळे आता तरी कायद्यात सुधारणा करून अशा गो तस्करी करणाऱ्यावर तर त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page