*देवरुख शहराच्या नळ पाणी योजनेला मंजुरी मिळाल्याच्या बातमी नंतर देवरूखात दिवाळी साजरी*
*देवरूख:* देवरुख नगर पंचायत माजी नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये यांच्या कारकिर्दीत सादर केलेल्या पाणी योजनेच्या डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) ला मंगळवारी तांत्रिक मंजुरी मिळाली. समस्त देवरुखवासियांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी आता लागणार आहे.
देवरुखवासियांना २४ तास पिण्याचे पाणी नळयोजनेद्वारे देण्याचा मानस ठेवून देवरुख नगर पंचायत नगराध्यक्षा मृणाल शेट्ये आणि त्यांच्या सर्व सहकारी नगरसेवकांनी पाणी योजनेचा महत्वाकांशी प्रकल्प हाती घेतला. नगर पंचायत मुख्याधिकारी चेतन विसपुते, पाणी विभागाच्या सर्व कर्मचारी आणि नाशिकचे राहुल सूर्यवंशी यांनी या योजनेचा डीपीआर बनविण्यास खूप मेहनत घेतली.
देवरुख शहराला मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी एका बंधाऱ्याची आवश्यकता होती. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी करताच तातडीने पालकमंत्री महोदयांनी देवरुख शहराच्या बंधाऱ्यासाठी सहा कोटी रुपये मंजूर केले.
पाणी योजनेस तांत्रिक मंजुरी मिळवणे हा यामधील महत्त्वाचा टप्पा होता. या करिता आमदार शेखरजी निकम साहेब यांनी प्रचंड मेहनत घेतली.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी देखील या कामी वेळो वेळी सहकार्य केले.
आता महायुतीच्या सरकारमध्येच या योजनेला प्रशाकीय मंजुरी मिळून आर्थिक तरतूद होईल. देवरुख वासियांना २४ तास पाणी देण्याचे स्वप्न साकार होईल.
*देवरुख शहराच्या नळ पाणी योजनेला मंजुरी मिळाल्याच्या बातमी नंतर देवरूखात दिवाळी साजरी*
*देवरुख शहराला २४ तास पाणी देणाऱ्या ५२ कोटीच्या योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाल्या नंतर देवरुख मध्ये फटाके आणि पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला.*
*आमदार श्री शेखर निकम यांचे देवरुख वासीयानी आभार मानले असून यासंदर्भात शी बोलताना आमदार निकम यांनी राज्यातील महायुतीच्या नेत्यांना धन्यवाद दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पालक मंत्री उदय सामंत यांच्यासह महायुतीतील सर्व वरिष्ठ नेत्यांनी या कामात सहकार्य केल्यानेच मंजुरी मिळाली असे त्यांनी यावेळी नमूद केले*