आम्‍ही पहिल्‍यापेक्षा तीनपट अधिक मेहनत करणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Spread the love

नवी दिल्ली- आजपासून १८ व्या लोकसभेला सुरुवात होत आहे. जगातील सर्वात मोठी निवडणूक अतिशय भव्य आणि दिमाखदार पद्धतीने पार पडली. ही निवडणूकही खूप महत्त्वाची ठरली कारण स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा लोकसभेत देशाने एका सरकारला सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली असल्‍याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

आम्‍ही यापुढेही पहिल्‍यापेक्षा तीनपट अधिक मेहनत करणार असल्‍याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नव्या संसद भवनात पहिल्‍यांदाच शपथविधी सोहळा होत असल्‍याचे सांगत त्‍यांनी नव्या खासदारांना शुभेच्छा दिल्‍या. संसदीय अधिवेशनाआधी संसद भवन परिसरातून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ व्या लोकसभेत युवा खासदारांची संख्या अधिक असल्‍याचे सांगितले. देश चालवण्यासाठी सहमती अत्‍यंत गरजेची होती.

तिसऱ्यांदा एकाच सरकारला सेवा करण्याची संधी जनतेने दिल्‍यांचे सांगत, आम्‍ही सर्वांना एकत्र घेउन पुढे जाण्यासाठी ईच्छुक असल्‍याचे ते म्‍हणाले.पुढे बोलताना त्‍यांनी उद्‍या आणीबाणीच्या काळ्या आठवणींना ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. २५ जून हा कधीच न विसरणारा दिवस आहे. देशाला एका चांगल्‍या विरोधी पक्षाची आवश्यकता असल्‍याची भावनाही त्‍यांनी यावेळी व्यक्‍त केली. विकसित भारताचं स्‍वप्न पूर्ण करणं हेच सर्वांचं कर्तव्य आहे. जनतेचा विश्वास आणखीन मजबूत करणं हे आमचं कर्तव्य आहे. प्रत्‍येक पाउल आपल्‍याला लोकहितासाठी उचलायचा असल्‍याचं त्‍यांनी सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page