करंबेळे येथे एसटीबस दरीत पलटी; ११ प्रवासी जखमी…

Spread the love

(मकरंद सुर्वे संगमेश्वर )

देवरुख- संगमेश्वर एसटीबस दरीत उलटून झालेल्या अपघातात ११ प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात करंबेळे येथील संजय महाडिक यांच्या घरानजीक गुरुवारी ४ वाजण्याच्या सुमारास झाला.

या अपघातामध्ये दूर्वा मनोज गोसावी वय 28 वर्षे, रा मुचरी गोसावी वाडी ,संतोष रावजी कुवळेकर वय 55 राहणार निवळी , सुगंधा रघुनाथ सोळकर वय 50 लोवले पडयेवाडी, सायली संजय गुरव वय 35 राहणार पिरंदवणे, काव्या संजय गुरव 14 वर्षे, शिवाजी सिताराम पवार वय 69 वर्षे कारभाटले, अभिजीत धोंडीराम येडके रा देवरुख, , रमाकांत रामदास दुगवले 18 वर्षे राहणार मुर्तवडे, अर्चना अशोक ओक राहणार चिपळूण, वैशाली विष्णू पडवेकर ,राहणार फणसवणे अमृता आशिष भिडे’ वय 39 वर्षे हे जखमी झाले आहेत.

देवरुख – संगमेश्वर राज्यमार्गावर देवरुखातुन सुटलेली एसटीबस गाडी क्रमांक एमएच २० बीएल २११२ हि बस ३.३० ला देवरुखहुन संगमेश्वरला जात असताना बसचालक निळोबा मुंडे याचे बस वरील नियंत्रण सुटल्याने करंबेळे मोरीच्या पुढील बाजुस ही बस संजय महाडीक यांच्या कंपाउंड मध्ये रस्ता सोडुन २० फुट दरीत जाऊन कोसळली.

जखमींना ग्रामस्थांनी सीडीच्या सहाय्याने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.आणि तात्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी देवरुख आणि संगमेश्वर पोलिस स्थानकाच्या पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. संघर्षाचे पोलीस शिंदे, कांबळे, जोयशी, बरगले, मनवळ, वैभव कांबळे, अंब्रे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.देवरुख पोलिस आणि देवरुख आगाराचे व्यवस्थापक हनुमंत फडतरे आणि अधिकारी यांनी पंचनामा केला.

बस पलटी झाल्याचे वृत्त कळताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अपघात स्थळी भेट देऊन पाहणी केली.

फोटो: करंबेळे येथे बस दरीत पलटी झाली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page