श्रीनगर- जम्मूच्या रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी प्रवाशांनी भरलेल्या बसवर हल्ला केला आहे. गोळीबारात बस चालकाला गोळी लागल्याने बस दरीत कोसळली. या घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे.
दहशतवाद्यांनी बसवर गोळ्या झाडल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस खोल दरीत कोसळली. या गोळीबारत बस चालकाला गोळी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, ही ५५ सीटर बस होती आणि ही बस शिवखोडीहून कटराकडे जात होती. या हल्ल्यात१० जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
एसएसपी रियासी मोहिता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये प्रवास करणारे लोक स्थानिक नसून उत्तर प्रदेशचे भक्त होते. ते शिवखोडीहून कटरा येथे होते. दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केल्याने बसचे नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली. या घटनेत ३३ जण जखमी झाले आहेत. बचाव कार्य पूर्ण झाले आहे. मात्र प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही. संपूर्ण परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.