मुंबई- एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला संधी मिळालेली नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तळ ठोकूनही पदरी निराशा आली आहे.दोन तास खासदार सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अजित पवार यांच्या मनधरणींचे जवळपास दीड तास प्रयत्न करण्यात आले. अजितदादांना धक्का देत पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारापासून त्यांना दूर ठेवण्यात येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान खासदार सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अजित पवार यांच्या मनधरणींचे प्रयत्न सुरू होते. अजितदादांना धक्का देत पहिल्या मंत्रिमंडळर विस्तारापासून त्यांना दूर ठेवण्यात येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर काहींना अजितदादा गटात तटकरे, पटेंलामध्ये कुणाला संधी द्यावी हे ठरलत नसल्याने देखील मंत्रिपदाचा कॉल आला नाही असे बोलले जात आहे.
दिल्लीमध्ये सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी खलबते सुरु आहेत. दिल्लीत अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची बैठक सुरु असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तटकरेंच्या निवासस्थानी जात दीड तास चर्चा केल्याची माहिती आहे.
नेते मोदींच्या निवासस्थानी दाखल..
शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदी पंतप्रधान निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची भेट घेत आहेत. या बैठकीत सहभागी होण्यासाठी संभाव्य मंत्र्यांसह भाजपचे नेते पोहोचू लागले आहेत. अमित शाह, जेपी नड्डा, बीएल वर्मा, पंकज चौधरी, शिवराज सिंह चौहान, किरण रिजिजू, जितीन प्रसाद, रवनीत सिंह बिट्टू, अन्नपूर्णा देवी, अर्जुन राम मेघवाल, नित्यानंद राय, अर्जुन मेघवाल असे भाजप नेते पोहोचले आहेत. आरजेडी नेते लल्लन सिंह, रामनाथ ठाकूर, लोजप नेते चिराग पासवान हेही पोहोचले आहेत.
काय असू शकतात कारणे?..
प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी नागरी आणि उड्डाण मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे पक्षाच्या वाट्याला येणारं कॅबिनेट मंत्रीपद नवख्या व्यक्तीकडे देण्याऐवजी अनुभवी व्यक्तीकडे देण्याचा बैठकीचा कल होता. त्यामुळेच पटेल यांना मंत्री करण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले गेले. पटेल यांना नागरी उड्डाण मंत्रीपद मिळू शकते अशी चर्चा होती. मात्र, जनतेतून निवडून आलेला खासदार मंत्रिमंडळात असेल तर विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो. म्हणून त्यांचे नाव मागे पडल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे सुनील तटकरे हे गेली अनेक वर्षे अजित पवारांचे निकटर्तीय म्हणून परिचित आहेत. त्यांना मंत्रिपदाची शपथ दिल्याने पक्षाला कोकणासह मुंबईत विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो. तर शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून परिचित असलेले प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी फुटीनंतर अजितदादा गटाची साथ दिल्याने ते अजित पवारांची किती साथ देतील आणि ग्राऊंड लेव्हलवर त्यांच्या मंत्रिपदाचा पक्षाला किती फायदा होईल हे सर्व पाहता पक्षात एकमत होत नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.