मकरंद सुर्वे ,संगमेश्वर-
संगमेश्वर तालुक्याला मान्सून पूर्व पावसाने झोडपले असून वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे मानस कोंड येथे खड्ड्यामध्ये तीन ते चार फूट पाणी साचल्याने अनेक गाड्या अडकून पडल्या होत्या रात्रीच्या दरम्याने या गाड्या अडकून पडल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या अडकलेल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. कोणतेही दक्षता न घेता सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे महामार्गावरून धावणाऱ्या गाड्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे गाड्या चिखलामध्ये बंद पडत असल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहे मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असली तरी चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदार कंपनीने कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न केल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मान्सून पूर्ण पावसाचा अलर्ट असतानाही राष्ट्रीय महामार्ग व कॉन्ट्रॅक्टर याचे दुर्लक्ष…
मान्सून पूर्व पावसाचा अलर्ट असतानाही रस्त्याची कामे दिम्या गतीने चालू आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील पाणी साचू नये म्हणून गटारे व त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे होते. परंतु राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी यांच्याकडून या संदर्भ मध्ये कोणतेही कारवाई झाल्याचे दिसून आलेले नाही. आरवली ते तळेगाव ते या टप्प्याचे काम जे एम म्हात्रे कन्ट्रक्शन कंपनी करत आहे. मान्सून अलर्ट असतानाही कंपनीकडून आजपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही. त्याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी पाणी व माती रस्त्यावर आल्याचे दिसून आलेले आहे. अनेक ठिकाणी पावसाळा पूर्वी लोकांना घरी जाण्याच्या रस्त्यांवरती कॉन्ट्रॅक्टर ने खडी किंवा त्यांच्या रस्त्यांची सोय केलेली नाही त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. हावे कॉन्ट्रॅक्टरचा मनमानी कारभार दिसून येत असूनही प्रशासन कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करताना दिसून येत नाही.
राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी मान्सून पूर्व पावसाचे तयारी करणे गरजेचे आहे व ती त्वरित करावी अशी नागरिकांची मागणी आहे. हवेचे काम व दर्जा होत आहे की नाही हे पाहणे अधिकाऱ्यांचे आहे परंतु अधिकारी कधीही साइटवर दिसून येत नाहीत. मान्सूनपूर्व पावसाबद्दल कामे पूर्ण करून कोकणी माणसाला मदत करावी अशी अर्थ मागणी नागरिकांचे आहे.