मुंबईत १३ तारखेला आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे वाढत्या उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता मुंबईच्या तापमानात वाढ होऊ लागली आहे. पुण्यात तापमान वाढी सोबतच अवकाळी पावसाचा तडाखा पुणेकरांना बसत आहे.
मुंबईत १३ तारखेला आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे वाढत्या उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता मुंबईच्या तापमानात वाढ होऊ लागली आहे. पुण्यात तापमान वाढी सोबतच अवकाळी पावसाचा तडाखा पुणेकरांना बसत आहे.
मुंबईत १३ मे रोजी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला होता. या पावसानंतर मुंबईत तात्पुरता गारवा जाणवत होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील उकाडा वाढला वाढला आहे. बुधवारी उष्णतेमुले नागरिक बेजार झाले होते. आज गुरूवारी देखील हीच परिस्थिती कायम आहे. मुंबईतील उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना आणखी काही दिवस घामाच्या धारा सोसाव्या लागणार आहेत. मुंबईत बुधवारी ३७ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर पुण्यात देखील हीच परिस्थिति आहे. अवकाळी पासून आणि वाढते उन असा दुहेरी मारा पुणेकर सहन करत आहेत. सकाळी, दुपारी उन्हाची तीव्रता वाढत असून संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. पुण्यात बुधवारी ३७.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली
राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पाऊस बरस आहे. काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस सोडला तर उर्वरित राज्यात पुन्हा तापमान वाढू लागले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक भागांमध्ये पाऊस किंवा वीजांच्या गडगडाटासह पाऊस बरसू शकतो.
मुंबईकर पुन्हा उकड्याने हैराण झाले आहे. सकाळ पासून असलेल्या उष्ण व दमट हवामानामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. मुंबईत बुधवारी ३७. ६ तर सांताक्रूझ येथे ३७.२ ऐवढ्या तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने मुंबईसह कोकण, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही आज उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. कोकणात देखील मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. काही तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून तात्पुरता दिलासा नागरिकांना मिळाला होता. मात्र, त्यांना आता पुन्हा उन्हाच्या तडाख्याला सामोरे जावे लागत आहे. अलिबाग येथे ३७.७, रत्नागिरी येथे ३६, पणजी येथे ३४.७, तर डहाणू येथे ३७.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.