ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.
▪️मेष :
आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे, असं वाटत राहील. एखाद्या मंगल कार्याला उपस्थिती लावाल. प्रवास संभवतो. रागावर ताबा ठेवावा लागेल. संतापामुळं नोकरी, व्यवसायात किंवा घरी मतभेद होतील.
▪️वृषभ :
आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज कामाचा खूप व्याप व खाण्या-पिण्याची बेपर्वाही यामुळं आरोग्य बिघडेल. वेळेवर जेवण आणि झोप न झाल्यानं मानसिक बेचैनी वाटेल. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता असल्यानं प्रवास करू नका. नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्यानं रोष ओढवून घ्याल. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्न करावेत.
▪️मिथुन :
आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपण मौज-मजा आणि मनोरंजन यांत विशेष रस घ्याल. कुटुंबीय, मित्रमंडळी आणि प्रिय व्यक्तीसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल. सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल. भिन्नलिंगी व्यक्तीचं आकर्षण वाटेल. प्रणयाराधनेची पूर्वपीठिका तयार होईल. सामाजिक जीवनात मान – सन्मानाचे धनी बनाल. हातून दान-धर्म आणि विधायक कामे होतील.
▪️कर्क :
आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस खुशीचा आणि यशाचा आहे. कुटुंबात सुख शांती आणि समाधान राहील. नोकरदारांना कार्यालयात अनुकूल वातावरण राहील. नोकरवर्गाकडून लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभ होईल. आवश्यक खर्च होतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.
▪️सिंह :
आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण शारीरिक आणि मानसिकदृष्टया शांतपणे काम कराल. सृजनात्मक कामांची अधिक गोडी लागेल. साहित्य आणि कला क्षेत्रांत काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. परोपकाराचे कार्य कराल. मनाला आनंद वाटेल.
▪️कन्या :
आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज आपणास प्रतिकूलतेस तोंड देण्यास तयार राहावं लागेल. आरोग्य विषयक तक्रारी राहतील. मनावर काळजीचे दडपड राहिल्यानं मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी खटका उडेल. आईच्या प्रकृतीची काळजी राहील. अभ्यासाच्या दृष्टीनं काळ चांगला नाही. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादी संबंधित समस्या उदभवतील. पैसा खर्च होईल.
▪️तूळ :
आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज एखाद्या मांगलिक कार्यानिमित्त प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणामुळं घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल. कामा निमित्त बाहेर जावे लागेल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. नवीन कार्य सुरू करू शकाल. धनलाभ संभवतो. आजचा दिवस आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. नशिबाची साथ मिळेल.
▪️वृश्चिक :
आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज नकारात्मक मानसिक वृत्ती टाळावी. ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ या नीतीने वागा म्हणजे कुटुंबियांशी संघर्ष होणार नाही. आरोग्याच्या तक्रारी राहतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील.
▪️धनू :
आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस प्रवासाचा आहे. ठरविलेली कामे पूर्ण होतील. शरीर आणि मन स्वस्थ राहिल्यामुळं आपण उत्साही आणि आनंदी राहाल. कुटुंबात मंगलकार्ये ठरतील. स्वकीयांशी संवाद साधल्याने मन प्रसन्न राहील. समाजात मान आणि प्रतिष्ठा वाढेल.
▪️मकर :
आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज एखाद्या गूढ विषयाची गोडी लागेल. आपण त्याच्यातच मग्न व्हाल. तसेच त्यासाठी खर्च देखील कराल. कोर्ट – कचेरी संबंधी कामे निघतील. व्यावसायिक कामात विघ्न येईल. मित्रांच्या प्रतिष्ठेची हानी होईल. उत्साह आणि प्रसन्नता नाहीशी होईल. एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. कष्टाच्या मानानं फळ न मिळाल्यानं नैराश्य येईल.
▪️कुंभ :
आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज नवे काम हाती घेऊ शकाल. नोकरी – व्यवसायात लाभ होऊन अतिरिक्त प्राप्ती होईल. मित्रगण विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात आपणाला प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळेल. पत्नी आणि संततीकडून सुख समाधान लाभेल. एखादा प्रवास किंवा सहल संभवते. विवाहेच्छुउकांचे विवाह ठरतील. शरीर आणि मन आनंदी राहील.
▪️मीन :
आज चंद्र धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामातील यश आणि वरिष्ठ अधिकार्यांचं प्रोत्साहन आपला उत्साह द्विगुणित करेल. व्यापारी वर्गाला व्यापारात आणि उत्पन्नात वाढ होईल. येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्यांकडून लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. घरात सुख शांती नांदेल. प्रगती संभवते. सरकारकडून लाभ होईल.