निवडणूक प्रशिक्षण स्थळी पोहोचवण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था..

Spread the love

रत्नागिरी, दि. 27 (जिमाका) :द्वितीय प्रशिक्षण प्रक्रीया सुरळीत होण्याच्यादृष्टीने मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण स्थळी पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. प्रशिक्षण स्थळी पोहोचवण्यासाठी व परत आणण्यासाठी एसटी बसेसच्या वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

263 दापोली मतदार संघामध्ये दि.27 एप्रिल 2024 व 28 एप्रिल 2024 रोजी, 264 गुहागर मतदार संघामध्ये दि. 29 एप्रिल 2024 व 30 एप्रिल 2024 रोजी, 265 चिपळूण मतदार संघामध्ये दि. 28 एप्रिल 2024 रोजी, 266 रत्नागिरी मतदार संघामध्ये दि. 29 एप्रिल 2024 रोजी व 267 राजापूर मतदार संघामध्ये दि. 29 एप्रिल 2024 व 30 एप्रिल 2024 रोजी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे.


तृतीय प्रशिक्षण, मतदानाचे आदल्या दिवशी व मतदानाच्या दिवशीसुध्दा याप्रकारे एसटी बसेसच्या वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याबाबतच्या करारनामा एसटी महामंडळाशी करण्यात आलेला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page