संगमेश्वर /माखजन- संगमेश्वर तालुक्यातील माखजन ग्रामदेवता वाघजाई देवीचे शिंपणे मोठ्या उत्साहात साजरे झाले.
या वेळी पंचक्रोशीतील असंख्य भाविकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी नेत्रदीपक पालखी नाचवण्याचा सोहळा पार पडला . ढोल ताशांच्या गजरात मंदिराभोवती पालखी नाचवण्यात आली.दरवर्षी गुढी पाडव्याला होणाऱ्या या शिंपण्याला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
शिमग्यात पालखी ची गावभोंवणी झाल्यावर पाडव्याला देवळाभोवती फेऱ्या मारत पालखी नाचवली जाते.व त्यानंतर पालखी मंदिरात आसनस्थ होते. यावेळी मंदिराभोवती जत्रा भरते. लहानांपासून मोठ्या पर्यँत सर्वजण या जत्रेचा आंनद घेतात विविध खाद्य पदार्थ व लहान मुलांच्या खेळण्याची दुकाने उघडली जातात. मुबंई कर चाकरमानी मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. नुकत्याच दहावी बारावी परीक्षा संपल्याने शालेय विदयार्थी खरेदी साठी गर्दी करतात. शिमगोत्सव हा आनंद व उत्साहाचा सण असल्याने लोकांची हजेरी मोठ्या प्रमाणावर असते.