नवी दिल्ली- घरगुती गॅस ग्राहकांना एलपीजीचा अखंडीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आता ई – केवायसीची प्रक्रिया लवकरात लवकर करावी लागणार आहे. जर तुम्ही अद्याप हे काम केले नसेल तर लवकरच तुम्ही तुमच्या गॅस कनेक्शनसाठी केवायसी करुन घ्या. पेट्रोलियम कंपन्यांकडून त्यांच्या ग्राहकांना एलपीजी गॅस कनेक्शन चालू ठेव÷ण्यासाठी ई केवायसी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
लवकरात लवकर तुम्ही तुमच्या नजीकच्या गॅस वितरकाशी संपर्क साधून ई केवायसी प्रक्रीय पूर्ण करुन घ्या पहिल्या टप्प्यात उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांचे ई केवायसी पूर्ण झाले आहे. जर केवायसी न केल्यास सबसिडी समाप्त होण्याव्यतिरिक्त कनेक्शन ब्लॉक करण्याचा निर्णय सबंधित पेट्रोलियम कंपनी घेऊ शकते, असे झाल्यास घरगुती गॅस ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळणार नाही. एकंदरीत गॅस कनेक्शनसाठी ई केवायसी ची प्रक्रीय बंधनकारक आहे हे काम ज्यांनी केले नसेल त्यानी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे