भाजपा आमदार नितेश राणे :
शिवसेना (उबाठा)पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे काल रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानात आयोजित इंडिया आघाडीच्या महारॅलीत सहभागी झाले होते. (Nitesh Rane criticized Thackeray) त्यावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंसह खासदार संजय राऊतांवर जोरदार टीका आहे.
मुंबई : BJP MLA Nitesh Rane : भाजपा आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. “काल काँग्रेसच्या कोठ्यावर जाऊन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नाचले. त्याचा व्हिडिओ आम्ही दाखवायचा का?” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसंच (Lok Sabha Election 2024) “माँ-बेटे की सरकार देश विकत होते. तर बाप-बेटा मुंबई विकत होते,” असा आरोपही त्यांनी केलाय. काल दिल्लीत झालेल्या महारॅलीत उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपा हा ठगांचा पक्ष आहे असा घणाघात उद्धव ठाकरेंनी या सभेतून केला होता. त्याला उत्तर देताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतलं.
संजय राऊत यांच्यावर जहरी टीका…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केली. त्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले, “अपेक्षेप्रमाणे संजय राऊत यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांनी जावईशोध लावला आहे. मोदींच्या दौऱ्याचा खर्च किती आहे हे निवडणूक आयोगाला माहीत आहे. (BJP MLA Nitesh Rane) उद्धव ठाकरे रविवारी दिल्लीला गेले. त्याचा खर्च किती झाला याची माहिती आधी घ्या. ज्याने साधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही. ज्यांनी साधी सरपंचपदाची निवडणूक लढवली नाही? त्यांनी आचारसंहितेवर बोलत बोलणं हा मोठा विनोद आहे,” अशी कोपरखळीही नितेश यांनी मारली.
दिशा सालियानवर चित्रपट काढा…
देवेंद्र फडणवीस यांना मणिपूरला पाठवण्यासाठी स्वतःच्या खिशातून खर्च करू, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना नितेश राणे यांनी,
“फडणवीस यांच्या मणिपूर दौऱ्याचा खर्च उचलण्याची भाषा करण्यापेक्षा ‘दिशा सालियन फाईल’ नावाचा चित्रपट प्रदर्शित करा आणि त्यात मुलाला हिरो म्हणून काम द्या,” असं म्हणत या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार तोच असल्याचा गंभीर आरोप पुन्हा एकदा केला.
प्रकाश आंबेडकर यांना जे हवं ते दिलं नाही..
प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवार दिले, ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाने आपला उमेदवार उभा करावा महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना जे हवं ते दिलं नाही, त्यामुळे त्यांनी आघाडीच्या विरोधात उमेदवार दिला आहे, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.