▪️दिपक भोसले/संगमेश्वर- संगमेश्वर कोल्हापूर राज्य मार्गावरील करंबेळे घाटामध्ये दरडी कोसळत असल्याने राज्य मार्ग धोकादायक बनलेला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूर कडे जाणारा हा जवळचा मार्ग आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या या मार्गावरून धावत असतात. संगमेश्वर तालुक्याचे देवरूख हे शासकीय कार्यालय असल्याने ग्रामस्थ तसेच पालक वर्ग विद्यार्थी वर्ग देवरुख कडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर करत असतात.
▪️याच मार्गावर माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा महविद्यालय असल्याने शाळेतील विद्यार्थी येजा करण्यासाठी या मार्गाचा उपयोग करतात. मात्र या मार्गावर करंबेळे घाटात दरडी कोसळत असल्याने दगड रस्त्याच्या बाजूला येऊन हा मार्ग धोकेदायक बनला आहे.
▪️तसेच घाट रस्त्यावर संरक्षक कठडे तुटल्याने गाड्यांचे अपघात होत आहेत. अनेकजण जखमी तसेच मृत्यूला समोरही जावे लागत आहे. त्यामुळे या घाट रस्त्याची त्वरित दुरुस्ती व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. दरड कोसळत असताना बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत असून अपघात घडल्यास बांधकाम विभाग याला जबाबदार राहील असा आरोप प्रवाशांनी आणि पादचाऱ्यांनी केला आहे