पारंपारिक भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडेच कायम ठेवावा-मुरबाड तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार…

Spread the love

ठाणे मुरबाड /प्रतिनिधी/ लक्ष्मण पवार – बुधवार, दिनांक २७ मार्च २०२४ रोजी मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने जाहीर झालेल्या प्रसिद्धीपत्रकात भिवंडी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी महाविकास आघाडी कडून काँग्रेस पक्षाला घेण्यात यावी या संदर्भातली आग्रही मागणी काँग्रेस कमिटीचे मुरबाड तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात व किसान काँग्रेसचे प्रदेश सचिव तुकाराम ठाकरे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष संध्या कदम, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष धनाजी बांगर, तालुका सचिव भगवान तारमळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

मागील लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला ३, ६७,००० मते प्राप्त झाली होती एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य प्राप्त झाले होते तसेच २०१९ च्या निवडणुकीच्या वेळेस चे संघटना बांधणी आणि आत्ताची २०२४ लोकसभा निवडणुकीच्या वेळेस संघटना बांधणी यामध्ये विचार केला तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुरबाड तालुक्यामधील २०४ बूथ मध्ये बुथ अध्यक्ष, BLA व बूथ कमिटी अशा मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा संच तयार असल्यामुळे मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळू शकतो अशी भावना संपूर्ण तालुक्यातील कार्यकारणी पदाधिकारी,जेष्ठ नेते व कार्यकर्ते यामध्ये आहे.

भिवंडी लोकसभा ही पारंपारिक काँग्रेस पक्ष लढत असून या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाने आपला दावा भिवंडी लोकसभा मतदारसंघावर केला आहे तरी काँग्रेस पक्षाचे पक्षश्रेष्ठींनी कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता प्रत्यक्षात ग्राउंड वरती काँग्रेस पक्षाचे संघटन आहे हे संघटन मोठ्या प्रमाणात असून
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर अजितदादा पवार गटामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते गेले असल्यामुळे शरदचंद्र पवार या गटांमध्ये थोडक्यात कार्यकर्ते शिल्लक राहिले असल्यामुळे सदरील जागेवर उपस्थित आणि केली. भिवंडी लोकसभा मतदारसंघाकरिता काँग्रेस पक्षाच्या वतीने जो कोणी उमेदवार असेल त्याचं प्रामाणिक काम करू परंतु सदरची जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला सोडली तर वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निर्णय जाहीर करू असे प्रतिपादन चेतनसिंह पवार यांनी केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page