चिपळूण- महाशिवरात्री निमित्त मतदार संघातील विविध शिवमंदिर चे दर्शन आमदार शेखर निकम यांनी घेतले.
कळंबुशी मधील पुरातन पांडवकालीन असलेले आमनायेश्र्वर मंदिर ल भेट देत देवाचे दर्शन घेतले. ग्रामस्थांनी मंडळाच्या वतीने आमदार शेखर निकम यांचा शाल श्रीफळ देत यथोचित सन्मान केला व आजपर्यंत विकास कामात केलेय सहकार्य बद्दल आभार मानले.
आमदार शेखर निकम यांनी देखील ग्रामस्थांचे आभार मानत आपणं पांघरलेल्या मायेच्या शालीची जाणीव मला कायम आहे. विकास करताना आपणं सर्वांनी एकत्र येऊन काम करूया व राजकारण विसरून आपणं आपलेपणाने आजपर्यंत माझा सोबत राहत आला आहत त्याबद्दल मी कायम आपला ऋणी आहे. मंदिर व आपल्या परिसराचा विकास करण्या करिता मी कायम कटिबध्द आहे असे म्हणत ग्रामस्थांचे आभार मानले.
यावेळी व्यासपीठावर त्यांचा समवेत रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती. अंकिता ताई चव्हाण,विभाग अध्यक्ष महेश बाष्टॆ,पांडुरंग चव्हाण, मंडळाचे संचालक सुधाकर चव्हाण, युवा नेते व विशेष कार्यकारी अधिकारी अक्षय चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य महेश घाणेकर,सदस्या अंजली चव्हाण, सदस्या सायली चव्हाण, मुख्याध्यापक श्री घाटगे,गजानन दिवाळे, अनंत दिवाळे,शरद कातकर,अजित चंदिवडे, भारती जड्यार,दिनेश चव्हाण,शरद लिंगायत,नितीन दरडे,संजय धावडे व इतर कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.