देवरुख- दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित लॅपटॉप वितरण सोहळा शनिवारी नक्षत्र सभागृह देवरूख येथे संपन्न झाला.
संगमेश्वर तालुक्यातील मागणी केलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप कार्यक्रमासाठी आमदार शेखर निकम, दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष संतोषदादा हासुरकर, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, देवरूख नगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन विसपुते , सिने अभिनेते व दिग्दर्शक अमोल देसाई; नक्षत्र सभागृहाचे मालक मनोज गोखले, प्रियदर्शनी पतसंस्थेचे चेअरमन हनिफ हरचिरकर, राज्य सरचिटणीस सागर टक्के, राज्य व जिल्हा कार्यकारिणी सदस्य अर्जुन दळवी, भुषण पाटील, दुर्गवीर संगमेश्वर तालुका प्रमुख तेजस रेवणे, तालुका संघटक योगेश सावंत, देवरुख व्यापारी संघटनेचे सदस्य प्रफुल्ल भुवड, बेलारी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश पांढरे, देवरूख पर्शरामवाडी शाळेचे मुख्याध्यापक महावीर कांबळे आदी उपस्थित होते.
सामाजिक जाणिवेची बांधिलकी जपत दुर्गवीर प्रतिष्ठान आजवर विविध प्रकारचे उपक्रम हाती घेत आहे. संगमेश्वर तालुक्यातील शाळांसाठी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे सर्व पाहुण्यांनी आणि शाळांतील शिक्षकांनी भरभरून कौतुक केले.
शिवरायांचा वारसा जतन करणाऱ्या या सर्व टीम सोबत राहण्याचे आवाहन केले .उन, वारा, पाऊस, थंडी यांची तमा न बाळगता गेली अनेक वर्षे शिवरायांच्या किल्ल्याचे संवर्धन करणारे हे आधुनिक काळातील मावळेच आहेत . शासन दरबारातील विविध योजना राबवून किल्याच्या संवर्धनासाठी आणत आहोत असे आमदार निकम यांनी सांगितले.
▪️तर शिवरांयाचा इतिहास शिकणारे (विद्यार्थी), शिकविणारे (शिक्षक)आणि इतिहास जतन करून वारसा जपणारे (दुर्गवीर)असा त्रिवेणी योग आज सभागृहात असल्याने हा ही एक मोठा इतिहास घडू शकतो यासाठी आम्ही नेहमीच आपल्या सोबत आहोत, असे रोहन बने यांनी सांगितले.
उपस्थित शाळांतील सर्व शिक्षकांच्या वतीने दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोषदादा हासुरकर व सरचिटणीस सागर टक्के यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शिक्षकांचे प्रतिनिधी महावीर कांबळे यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत डिंगणकर, तेजस रेवणे, योगेश सावंत, निशांत जाखी , अजय सावंत, राजेश सावंत, स्वप्नील साप्ते, प्रवीण सोष्टे, विराज नटे, ओंकार सावंत, सेजल वास्कर, प्रतिक्षा बाईत, सतीश वाकसे यांनी मेहनत घेतली.