कल्याण प्रतिनिधी/लक्ष्मण पवार- कल्याण न्यायालयात जागतिक महिला दिन प्रचंड गर्दीत संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय एडवोकेट प्रकाश जगताप साहेब होते तर सन्माननीय अतिथी म्हणून रामशास्त्री बा न्या ने न्याय देणारे जिल्हा सत्र न्यायाधीश सन्माननीय शिवाजीराव कचरे साहेब होते. यावेळी 200 महिला वकील भगिनींचा राजमाता जिजाऊ मा साहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हा पुरस्कार देऊन जिल्हा न्यायाधीश सन्माननीय कचरे साहेब यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
सर्वश्री वकील भगिनी एडवोकेट चंद्रावती पी सर खोत, एडवोकेट नीता संग्राम, कदम एडवोकेट अर्चना रमेश सबनीस, एडवोकेट विद्या गुणाजी मोहिते, एडवोकेट माधुरी बळवंत जोशी, एडवोकेट माया चिंतामण गायकवाड, एडवोकेट शिल्पा राजुराम, एडवोकेट उज्वला जयंत पाटील एडवोकेट विजया विजय कडव अडवोकेट सोनाली सुरेश भगत एडवोकेट माधुरी दिनेश केवाळे एडवोकेट ज्योती अर्जुन शेकडे एडवोकेट अपेक्षा अरुण दळवी एडवोकेट प्रविशाप्रसाद परब या 15 महिलांचा राजमाता जिजाऊ मासाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन जिल्हा सत्र न्यायाधीश सन्माननीय शिवाजीराव कचरे साहेब यांचे शुभ हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर कल्याण न्यायालयातील महिला न्यायाधीश माननीय पठाण मॅडम माननीय लंबाते मॅडम यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले वकील संघटनेचे उपाध्यक्ष एडवोकेट गणेश पाटील यांनी सर्व सन्माननीय वकील भगिनींना पाऊ च भेट दिले त्याचबरोबर वकील संघटनेचे सन्माननीय सदस्य एडवोकेट प्रदीप बावस्कर यांनी न्यायालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प व पेन भेट देऊन सन्मानित केले.
त्यानंतर लकी ड्रॉ काढून भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रम म्हटला की निधी लागतो आमचे वरिष्ठ वकील एडवोकेट साईनाथ बाळकृष्ण बगाडे साहेब यांनी त्यांच्या आदर्श माता स्व राधिका बाळकृष्ण बगाडे यांच्या स्मृतिपित्यर्थ 9 999 रुपये दिले तसेच आमचे सभासद एडवोकेट माधुरी केवाळे मॅडम यांनी स्वेच्छेने रुपये 6000 दिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सह खजिनदार एडवोकेट क्रांती रोठे मॅडम सदस्या एडवोकेट मनीषा धिवरे यांनी विशेष परिश्रम घेतले संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव खजिनदार सह खजिनदार सर्व कार्यकारणी सदस्य व वकील बंधू भगिनी या कार्यक्रमास प्रचंड संख्येने उपस्थित होते यावेळी जेष्ठ पत्रकार एडवोकेट शांताराम दांडेकर यांचा कल्याण वकील संस्थेच्या अध्यक्ष सन्माननीय प्रकाश जगताप यांनी सत्कार केला