भाजप आमदार राम शिंदे यांच्याकडून बाळासाहेब थोरात यांना पक्ष प्रवेशाची ऑफर…

Spread the love

अहमदनगर: भाजप हा देशात सर्वात मोठा पक्ष आहे. केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार आहे. त्यामुळे अन्य पक्षात जो कोणी दु:खी, अडचणीत आहे, ज्यांच्यावर अन्याय होत असेल, ज्यांना आसरा हवा आहे त्यांना आसरा देण्यास भाजप तयार आहे. अशा शब्दात अप्रत्यक्षपणे अहमदनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भाजप आमदार राम शिंदे यांनी एकप्रकारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना भाजप पक्षात येण्याची ‘ऑफर’ दिली आहे.

भाजप प्रवक्ते आ. राम शिंदे आज, शुक्रवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना शिंदे यांनी काँग्रेसमधील अंतर्गत कलहावरून देखील काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच शिंदे यांनी यावेळी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना देखील भाजप प्रवेशाची ऑफर दिली आहे.

दरम्यान पदवीधर निवडणुकीवर देखील शिंदे यांनी भाष्य केले. नाशिक पदवीधर निवडणुकीमुळे राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. काँग्रेसची बंडखोरी करून सत्यजित तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढली. यावर शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आम्ही पाठिंबा दिला म्हणूनच सत्यजित तांबे निवडून आले असा दावा शिंदे यांनी केला आहे.
बच्चू कडूंच्या वक्तव्यावर शिंदे म्हणाले

आमदार बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीचे १५ आमदार संपर्कात असल्याचा दावा केला, यासंदर्भात बोलताना आ. शिंदे म्हणाले की, बच्चू कडू हे भाजप व बाळासाहेबांची शिवसेनेच्या सहयोगी पक्षाचे आमदार आहेत, माजी मंत्री आहेत. त्यामुळे ते निश्चितच अधिकृत माहितीशिवाय बोलणार नाहीत, असे शिंदे म्हणाले आहे.

शिंदेकडून महाविकास आघाडीवर निशाणा…

सध्या स्थितीला महाविकास आघाडीमध्ये चलबिचल सुरू आहे. कोणामध्ये ताळमेळच नाही. तिन्ही पक्ष एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. कोण कधी फुटेल याचा थांगपत्ता लागत नाही, अशी त्यांची अवस्था आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page