मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मुलाच्या लग्नाची पत्रिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दिली. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी पत्रिका दिली. त्यांचा लग्न पत्रिका देतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी या समारंभास येणार नाहीत.
मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे लग्न शेतकऱ्याच्या मुलीशी, 200 पाहुण्यांच्या उपस्थितीत सात फेरे
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा मुलाचे लग्न साध्या पद्धतीने झाले
उज्जैन, दि. 24 फेब्रुवारी 2024 | उद्योगपती किंवा राजकीय लोकांकडे होणाऱ्या लग्नांची चर्चा जोरदार असते. लग्नात येणारी पाहुणे आणि खर्च यासंदर्भात अनेक बातम्या होत असतात. परंतु एखाद्या मुख्यमंत्र्याच्या मुलाचे लग्न होणार म्हणजे व्हीव्हीआयपीचा लवाजमा असतो. मतदार संघातील नव्हे तर राज्यभरातील लोक येणार असल्यामुळे चर्चेचा विषय असतो. परंतु मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या मुलाचे लग्न होत आहे. ते ही शेतकऱ्याच्या मुलीशी. या लग्नास फक्त २०० जणांच्या उपस्थिती असणार आहे. मोहन यादव यांच्या मुलगा वैभव यादव याचे लग्न मध्य प्रदेशातील हरदा येथील शेतकरी सतीश यादव यांच्या मुलगी शालिनीसोबत होत आहे. २४ फेब्रुवारी रोजीच शालिनी यादवसोबत वैभवसोबत सात फेरे घेणार आहेत. अगदी साध्या पद्धतीने हा समारंभ होत आहे.
फक्त 200 जणांची असणार उपस्थित…
लग्नात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि त्यांच्या परिवारातील सदस्य आणि मोजके राजकीय व्यक्ती असणार आहेत. तसेच लग्नानंतर स्वागत समारोह (रिसेस्पशन) होणार नाही. साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा होणार असून त्यात 200 जणांची उपस्थिती असणार आहे. राजस्थानमधील पुष्करमध्ये होणाऱ्या या समारंभात फक्त 200 पाहुणे येणार आहेत. त्यात वधू पक्षाकडून 60 तर वर पक्षाकडून 140 जण असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण..
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मुलाच्या लग्नाची पत्रिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दिली. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी पत्रिका दिली. त्यांचा लग्न पत्रिका देतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी या समारंभास येणार नाहीत.