शेतकऱ्यांनी ‘दिल्ली मार्च’ 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलल्यानंतर पोलिसांनी शनिवारी दिल्लीच्या विविध सीमेवरील नियम शिथिल केले आहेत. टिकरी आणि सिंघू सीमेवर पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी 29 फेब्रुवारीपर्यंत आंदोलन पुढे ढकलल्यानंतर, पोलिसांनी काल(शनिवारी) दिल्लीच्या विविध सीमेवर बॅरिकेड्स आणि नियम शिथिल केले आहेत. टिकरी बॉर्डर आणि सिंघू बॉर्डरवर पुन्हा वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी दिल्लीहून हरियाणात जाण्यासाठी आणि तेथून येण्यासाठी प्रत्येकी एक लेन खुली करण्यात आली आहे. दुसरीकडे, पोलिसांनी गाझीपूर सीमेवरील अनेक बॅरिकेड्सही हटवले आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी झाली आहे.
रस्त्यांवरील बॅरिकेड्स हटवण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा
शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली पोलिसांनी शनिवारी बहुतांश ठिकाणांवरील बॅरिकेडिंग हटवण्यात आले. 29 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच न करण्याते पाऊल उचलले आहे. त्यामुळे सीमेपासून दिल्लीच्या अंतर्गत रस्त्यांपर्यंत लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी लोकांना दिल्लीच्या सीमावर्ती भागातच नव्हे तर अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणचे बॅरिकेड्स पूर्णपणे हटवण्यात आलेले नाहीत, त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
गेल्या 10 दिवसांपासून दक्षिणेकडून नवी दिल्लीत प्रवेश करणाऱ्या न्यू मोतीबाग रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती, मात्र शेतकऱ्यांनी दिल्लीकडे निघणारा मोर्चा २९ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलल्याने पोलिसांनी शनिवारी बॅरिकेड्स हटवले. त्यामुळे मार्ग मोकळा होऊन वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला.
सामान्य दिवसांप्रमाणेच वाहतूक सुरळीत राहिली. मथुरा रोडवरील नीला गुंबडजवळ शनिवारीही सामान्य दिवसांप्रमाणेच वाहतूक सुरळीत होती. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता, तर शनिवारी वाहतूक सुरळीत झाली.