कुठलातरी पूर्वीचा फोटो दाखवून खाणेरडं राजकारण करणं योग्य नाही, जमीन खरेदी करणाऱ्यांची नावे जाहीर कराच म्हणजे दलाल कोणत्या पक्षाचे आहे ते कळतीलच -मंत्री उदय
रत्नागिरी : पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधारी शिंदे –फडणवीस सरकारला जबाबदार धरले आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शशिकांत वारीशे यांचा खून राजकीय असल्याचे म्हणत एक ट्विट केलं, ज्यात याप्रकरणातील संशयित आरोपी चालक पंढरीनाथ आंबेरकर याचा शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत यांच्यासोबतचा एक फोटो आहे. या फोटोवरून राऊतांनी अप्रत्यक्षरित्या मंत्री उदय सामंत यांचा या प्रकरणाशी संबंध जोडला आहे. मात्र मंत्री उदय सामंत यांनी कुठलातरी पूर्वीचा फोटो दाखवून खाणेरडं राजकारण करणं योग्य नाही, म्हणत राऊतांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
उदय सामंत म्हणाले की, शिवसेना खासदार संजय राऊत नाणार प्रकल्पाच्या ठिकाणी ज्यांनी जमिनी घेतल्या त्यांची नावं जाहीर करणार आहे, ही नाव त्यांनी जाहीर केलीच पाहिजेत, त्या जमिनीत नेमके दलाल कोण आहे, ते कोणत्या पक्षाचे आहेत हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. म्हणून संजय राऊत यांच्या पत्रात ज्यात नमूद दोन चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या जमिनी कोणाच्या आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला समजलं पाहिजे.
माझा ट्विट केलेला तो फोटो जुना आहे. तो फोटो नाकारण्याची आवश्यता नाही, मी मंत्री होऊन रत्नागिरीत गेलो होतो त्यावेळी अनेक जण येऊन फोटो काढतात त्यातील तो एक फोटो होता. तो फोटो काढला म्हणजे आम्ही त्याला पाठबळ दिलं असं होत नाही, त्याचे अनेक फोटो अनेक नेत्यांबरोबर आहेत. जो कोण नेता त्याचाबरोबर आहे, तो त्यात सामील आहे हे असं म्हणणं आणि बदनामीकारक खाणेरड राजकारण करणं योग्य नाही, असंही उदय सामंत म्हणाले आहेत.
रोज सकाळी महाराष्ट्रात वेगळं वातावरण निर्माण करण्यापेक्षा त्यांचे ज्या ज्या नेत्यांबरोबर फोटो आहेत त्याची चौकशी करणार आहेत का? असा सवालही उदय सामंत यांनी संजय राऊतांना केला आहे. ते पुढे म्हणाले की, मुद्दा असा आहे की, महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणं सोडलं पाहिजे. अशा खाणेरड्या कृत्यांच कोणीही समर्थन करणार नाही.
जाहिरात :