दिल्ली अबकारी कर घोटाळा : वायएसआर काँग्रेस खासदाराच्या मुलाला अटक…

Spread the love

दिल्लीतील अबकारी कर घोटाळ्याच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने वायएसआर काँग्रेस पक्षाचे लोकसभा खासदार मागुंता श्रीनिवासुलू रेड्डी यांचा मुलगा राघव मागुंता याला अटक केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बहुचर्चित अबकारी कर घोटाळा प्रकरणात सीबीआय तसेच ईडीने ज्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत, त्यात प्रमुख आरोपी म्हणून उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे नाव अग्रक्रमाने घेण्यात आलेले आहे. सिसोदिया यांनी बहुतांश पुरावे नष्ट केले असल्याचा दावा काही महिन्यांपूर्वी सीबीआयकडून करण्यात आला होता. अबकारी कर घोटाळाप्रकरणी ईडीने आतापर्यंत सहाजणांना अटक केली आहे.

दिल्लीतील अबकारी कर घोटाळा प्रकरणी ७६ कोटी ५४ लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. दिल्ली आणि मुंबईतील उच्चभ्रू वसाहतीतील घरे, रेस्टॉरंटस, ५० गाड्या तसेच बँकांमधील ठेवी यांचा जप्त संपत्तीमध्ये समावेश आहे.

आम आदमी पक्षाचे संपर्क विभागाचे प्रमुख विजय नायर, मद्य व्यावसायिक समीर महेंद्रू, त्याची पत्नी आणि त्यांचा इंडोसि्परिट ग्रुप, व्यापारी दिनेश अरोरा, अरुण पिल्ले, बडी रिटेल प्रा. लि. नावाच्या मद्य कंपनीचा संचालक अमित अरोरा यांची विविध प्रकारची संपत्ती ईडीने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये जप्त केली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page